सत्ताधारी पक्ष पोलिस यंत्रणेला 'कठपुतळी'सारखे वागवते; गोयचो आवाज पक्ष

राज्यातील पोलिस (Police) यंत्रणेला या सरकारने कटपुतली करून ठेवल्याने गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर (beach)अमली पदार्थ सेवनात वाढ झाली.
'गोंयचो आवाज' पक्षाची पत्रकार परिषद
'गोंयचो आवाज' पक्षाची पत्रकार परिषद Dainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी: पुढील वर्षी गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 'गोयचो आवाज' पक्ष आरोग्य व कायदा-सुव्यवस्था (Law and order)विधेयकाबरोबर ग्रह विभागातील पोलिस यंत्रणा महिला मुलाचे सुरक्षा विधेयक विधेयकाला मान्यता देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष स्वप्नेश शेर्लेकर (Swapnesh Sherlekar)यांनी दिली. तसेच गोव्यात युतीचे सरकार करण्यासाठी प्रादेशिक पक्ष आमच्या बरोबर बोलणी करीत असल्याची माहिती दाभोळी मतदार संघाचे 'गोंयचो आवाज' पक्षाचे उमेदवार कॅप्टन विरीयातो फर्नांडीस (Fernandes)यांनी दिली.

तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून त्याला पूर्णपणे जबाबदार येथील सरकार (Government)असल्याची माहिती शेर्लेकर यांनी दिली. संपूर्ण जगात कोरोना महामारीवेळी गोव्यातील सरकारने जनतेपर्यंत आरोग्यसेवा(Healthcare) पुरवण्यात अजिबात पुढाकार घेतला नाही. यामुळे करोना (Covid 19 )विषाणूमुळे राज्यातील अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे.

गोंयचो आवाज पक्ष राज्यात आरोग्य सेवेसाठी नवीन योजना राबवणार असून याचा फायदा गरीब मध्यमवर्गीयां बरोबर इतरांना होणार असल्याची माहिती अध्यक्ष स्वप्नेश शेर्लेकर यांनी दिली.

याप्रसंगी गोयचो आवाज पक्षाने गोव्यात पुढील वर्षी होणार्‍या विधानसभेसाठी प्रथम तीन उमेदवारी उमेदवारांची नावे जाहीर केली. यात दाबोळीतून कॅप्टन विरीयातो फर्नांडीस, थिवी मतदारसंघातून स्वप्नेश शेर्लेकर व कळंगुट मतदारसंघातून रोशन मथाईस. पुढील उमेदवारांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती शेर्लेकर यांनी दिली.

यावेळी, दाबोळीचे उमेदवार कॅप्टन विरीयातो फर्नांडीस यांनी माहिती दिली की गोव्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून याला पूर्णपणे जबाबदार येथील सरकार आहे. कारण येथील सरकारने गृह विभागातील पोलीस यंत्रणेचे हात बांधून ठेवल्याने पोलिसांना स्वतंत्रपणे जनतेची सेवा करता येत नसल्याचा आरोप कॅप्टन फर्नांडिस यांनी केला.

राज्यातील पोलिस(Police) यंत्रणा म्हणजे सत्ताधारी पक्षाचे हाताखालचे बाहुले झाले आहे. यात पोलिसांची कोणतीच चूक नसते. त्यांना राजकीय दबावामुळे आपली सेवा प्रामाणिकपणे जनतेला देता येत नाही. जशी पोलिस यंत्रणा तशीच आरोग्य सेवा देण्यास येथील सरकार सपशेल अपयशी ठरला आहे. दाबोळी चिखलीतील जिल्हा इस्पितळात अजूनही पूर्ण सुविधा उपलब्ध केल्या नाहीत. तसेच येथील राजकीय नेते चक्क उपजिल्हा इस्पितळ खाजगी करण्यासाठी पुढाकार घेत होते. तेव्हा ' गोंयचो आवाज'ने याला विरोध केल्याने सरकारने माघार घेतली होती. सामान्य जनतेची सेवा हिसकावून हे सरकार उद्योगपतीच्या घशात घालण्याचा षडयंत्र करीत असल्याची माहिती कॅप्टन फर्नांडीस यांनी दिली.

दाबोळीत प्रचारा बरोबर कोपरा बैठका घेताना मला व माझ्या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधीचे भाडोत्री गुंड अडथळा निर्माण करीत असल्याचा आरोप कॅप्टन फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेतून केला. यावेळी कळंगुटचे उमेदवार रोशन मथाईस याने राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना माहिती दिली की सरकार जनतेची सेवा न करता स्वतःची सेवा करीत आहे. जनतेला चांगली आरोग्य सेवा देण्यास सरकार असमर्थ ठरले आहे.

राज्यातील कायदा सुव्यवस्था सिद्धी नाईक यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांना शोधण्यास पुढाकार घेत नसल्याची माहिती माथाईस यांनी दिली. राज्यातील पोलिस यंत्रणेला या सरकारने कटपुतली करून ठेवल्याने गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर अमली पदार्थ सेवनात वाढ झाली असल्याची माहिती शेवटी रोशन माताईस यांनी दिली.

मुरगाव हार्बर येथील आयोजित पत्रकार परिषदेतून वरील माहिती 'गोंयचो आवाज' पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे अध्यक्ष स्वप्नेश शेर्लेकर, उपाध्यक्ष रोशन मथाईश, कॅप्टन विरीयातो फर्नांडिस, निनोयो कुरिया, जॉन मेंडोसा, रेजिना फर्नांडिस उपस्थित होते. पुढे पत्रकारांना माहिती देताना अध्यक्ष शेर्लेकर म्हणाले की राज्य सरकारने आरोग्य धोरणा जनतेच्या दारी पोचविण्यास कधीच पुढाकार घेतला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com