Goa News: अखेर 'ते' दुरुस्ती विधेयक रद्द: विश्वजीत राणे

Goa News: राज्यात कुठेही बेकायदा डोंगरकापणी होत असेल तर थेट मला फोन करा.
Vishwajit Rane
Vishwajit Rane Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: गोवा गेल्या विधानसभेत पारित केलेले आणि राज्यभर मोठा विरोध झालेले नगर नियोजन खात्याचे गोवा जमीन विकास आणि इमारत बांधकाम विनियोग (सुधारणा) दुरुस्ती विधेयक रद्द केल्याची माहिती नगर नियोजन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

दरम्यान, गेल्या विधानसभेत नगर नियोजन खात्याने जमीन विकास आणि इमारत बांधकाम कायदा 2008 मध्ये बदल करण्यासाठी दुरुस्ती विधेयक मांडले होते आणि ते विधानसभेच्या शेवटच्या दिवशी 19 जुलै रोजी मंजूर करून घेतले होते. या विनियोग दुरुस्ती विधेयकाला राज्यभरातून मोठा विरोध झाला होता.

Vishwajit Rane
Dabolim Airport: दाबोळी विमानतळ सुरु राहणार की, बंद?

तसेच, याशिवाय विविध राजकीय पक्षांनी नगर नियोजन खात्यासमोर निदर्शने केली होती. यामुळे श्रीमंतांचे आणि हॉटेल (Hotel) लॉबीचे भले होणार असले तरी पर्यावरणाचे प्रमाणामध्ये नुकसान होईल. निसर्गाची हानी होईल, असा आरोप विरोधकांनी केला होता. त्यामुळे अखेर हे विधेयक रद्द करण्यात आले.

बेकायदा डोंगरकापणी कापून घेणार नाही

राज्यात कुठेही बेकायदा डोंगरकापणी होत असेल तर थेट मला फोन करा. मी ते ताबडतोब बंद करीन. कोणत्याही परिस्थितीत राज्यातील पर्यावरणाचे नुकसान आणि डोंगरकापणी खपवून घेणार नाही, अशी तंबी नगर नियोजन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांनी पुन्हा एकदा दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mulgao Accident
 Goa Facebook Part Time Job Scam
Salaulim Dam Water Level
Lavu Mamledar Death Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com