
पणजी: राज्यात ग्रामसेवक पदे आता नव्याने भरली जाणार नाहीत. सध्या ग्रामसेवक म्हणून काम करणारे निवृत्त होईपर्यंत ते कार्यरत राहतील.
ग्रामसेवक आणि पंचायत सचिव अशी दोन्ही पदे एकत्र आणण्याचा विचार सरकारने चालवला आहे. त्यासंदर्भात प्रशासकीय उच्च पातळीवर विचारणा केल्यावर ग्रामसेवक पदच यापुढे प्रशासनात नसेल, असे सांगण्यात आले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ग्राम सचिव असे नवे पद यापुढे निर्माण केले जाऊन त्यात पंचायत सचिव आणि ग्रामसेवक यांना सामावून घेतले जाणार आहे.
सध्या ग्रामसेवक करत असलेली कामे ग्राम सचिवांकडे सोपवली जाणार आहेत. याशिवाय पंचायत सचिवांची कामेही ग्राम सचिव करणार आहेत. सध्या ग्रामसेवक म्हणून काम करणाऱ्यांना या नव्या जबाबदारीत सामावून घेतले जाणार आहे.
सध्या काही ठिकाणी ग्रामसेवक हेच पंचायत सचिव म्हणून काम पाहतात; परंतु पंचायत सचिव हे ग्रामसेवक म्हणून काम पाहत नाहीत. ग्राम सचिवांची पुढील वर्षी नवीन पदे तयार केली जातील. तालुक्यात किमान तीन ते चार जादा ग्राम सचिव असतील, असे नियोजन करून ही पदनिर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ग्रामसभा व पंचायत बैठकांची बोलावणी करणे, कार्यवाहीची नोंद ठेवणे, ठराव अंमलात आणणे, सरकारी योजना व आदेशांची अंमलबजावणी करणे ही त्याची मुख्य जबाबदारी आहे. ग्रामपंचायतीच्या उत्पन्न-खर्चाची नोंद, विविध कर व शुल्क वसुलीची देखरेख, नोंदवही व कागदपत्रांची सुरक्षितता आणि उच्च अधिकाऱ्यांना अहवाल सादर करणे, ही कामे तो पाहतो.
शेती, पाणीपुरवठा, ग्रामविकास, स्वच्छता, लघुउद्योग, स्वयंरोजगार अशा विविध योजना गावपातळीवर राबवण्यासाठी तो मदत करतो. ग्रामसभेत उपस्थित राहून गावकऱ्यांचे प्रश्न नोंदवणे, त्यांची अंमलबजावणीसाठी पंचायतीकडे पाठवणे, तसेच तांत्रिक मार्गदर्शन करणे ही त्याची महत्त्वाची कामे आहेत. थोडक्यात, ग्रामसेवक हा ग्रामविकासाचा प्रत्यक्ष दुवा असतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.