Vijay Hazare Trophy: समर, मंथन, विजेश, हेरंबचे पुनरागमन; एकदिवसीय संघ जाहीर

Vijay Hazare Trophy : गोव्याचा सोळा सदस्यीय एकदिवसीय संघ जाहीर
Vijay Hazare Trophy
Vijay Hazare TrophyDainik Gomantak

Vijay Hazare Trophy आगामी विजय हजारे करंडक एकदिवसीय सामन्यांच्या (लिस्ट ए) क्रिकेट स्पर्धेसाठी यष्टिरक्षक समर दुभाषी, फलंदाज मंथन खुटकर, वेगवान गोलंदाज विजेश प्रभुदेसाई व हेरंब परब यांनी गोव्याच्या सोळा सदस्यीय संघात पुनरागमन केले आहे. गतमहिन्यात सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत खेळलेल्या संघात त्यांचा समावेश नव्हता.

Vijay Hazare Trophy
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्यासाठी खेळलेल्या स्नूकर खेळाडूचा घरफोडी आणि वाहन चोरीत समावेश, दोघांना अटक

टी-20 स्पर्धेसाठी निवडलेल्या संघातील तुनीष सावकार, राजशेखर हरिकांत, कश्यप बखले व फेलिक्स आलेमाव यांना लिस्ट ए स्पर्धेसाठी गोव्याच्या संघात स्थान मिळालेले नाही. गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव रोहन गावस देसाई यांनी बुधवारी संघ जाहीर केला.

टी-20 क्रिकेट स्पर्धेतील कर्णधार दर्शन मिसाळ व उपकर्णधार दीपराज गावकर यांच्याकडे एकदिवसीय स्पर्धेसाठीही संबंधित जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. स्पर्धा मुंबई येथे खेळली जाईल.

गोव्याचा ई गटात समावेश असून त्यांची स्पर्धेतील मोहीम 23 नोव्हेंबरपासून सुरू होईल. मध्य प्रदेश, तमिळनाडू, पंजाब, नागालँड, बंगाल व बडोदा या संघांविरुद्ध त्यांचे सामने होतील. गतवर्षी गोव्याने या स्पर्धेत सातपैकी दोन सामने जिंकले होते, तर तीन पराभव पत्करावे लागले होते. अन्य लढतीत टाय व रद्द निकाल होता.

Vijay Hazare Trophy
NCC Training Camp: गौतमी चोडणकर ठरली नेव्ही विंगची सर्वोत्कृष्ट एनसीसी कॅडेट

गोव्याचा एकदिवसीय स्पर्धा संघ

ईशान गडेकर, राहुल त्रिपाठी, के. व्ही. सिद्धार्थ, सुयश प्रभुदेसाई, दर्शन मिसाळ (कर्णधार), दीपराज गावकर (उपकर्णधार), मंथन खुटकर, मोहित रेडकर, अर्जुन तेंडुलकर, समर दुभाषी (यष्टिरक्षक), शुभम तारी, विकास सिंग, स्नेहल कवठणकर, विजेश प्रभुदेसाई, लक्षय गर्ग, हेरंब परब.

गोव्याचे स्पर्धेतील वेळापत्रक

विरुद्ध मध्य प्रदेश (२३ नोव्हेंबर), विरुद्ध तमिळनाडू (२५ नोव्हेंबर), विरुद्ध पंजाब (२९ नोव्हेंबर), विरुद्ध नागालँड (१ डिसेंबर), विरुद्ध बंगाल (३ डिसेंबर), विरुद्ध बडोदा (५ डिसेंबर).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com