Goa Drug Case: गुप्त माहिती अन् अचूक निशाणा! वेर्णा पोलिसांची मध्यरात्री मोठी कारवाई; लाखोंच्या गांजासह झारखंडचा नागरिक गजाआड

Jharkhand Native Arrested With Drugs In Goa: वेर्णा पोलिसांनी सांकवाळ येथील जुआरीनगर परिसरात मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात एका 41 वर्षीय व्यक्तीला अटक केली.
Jharkhand Native Arrested With Drugs In Goa
Goa Drug CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश आले असून वेर्णा पोलिसांनी सांकवाळ येथील जुआरीनगर परिसरात मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात एका 41 वर्षीय व्यक्तीला अटक केली. संशयिताकडून सुमारे 1 लाख 36 हजार रुपये किमतीचा 1.362 किलो गांजा जप्त करण्यात आला. नंदकिशोर राय असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा झारखंडचा रहिवासी आहे. सध्या तो जुआरीनगर येथे राहत होता.

वेर्णा पोलिसांना या अंमली पदार्थांच्या व्यवहाराबाबत अचूक माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी, 25 जून रोजी रात्री 10:05 ते 11:40 च्या दरम्यान जुआरीनगरमधील 'बे व्हिलेज रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स'च्या समोरील परिसरात अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी संशयित नंदकिशोर राय याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे 136,200 रुपये किमतीचा 1.362 किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी एनडीपीएस कायद्यातील सर्व कायदेशीर आणि अनिवार्य तरतुदींचे पालन करुन पंचनाम्याद्वारे हा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला.

Jharkhand Native Arrested With Drugs In Goa
Goa Drug Case: 61 व्या दिवशी आरोपपत्र संशयिताच्या पथ्यावर, ड्रग्स प्रकरणात साहील खानला 'डिफॉल्ट जामीन'

वेर्णा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कॅरी फर्नांडिस यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे, आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम 20 (बी)(आयआय)(बी) अंतर्गत गुन्हा क्रमांक 68/2026 नोंदवण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यामध्ये त्याचा आणखी कोणाशी संबंध आहे का, तसेच हा गांजा गोव्यात (Goa) कोणाला विकण्यासाठी आणला होता, याचा पुढील तपास वेर्णा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रिस्ली कार्व्हालो करत आहेत. या कारवाईमुळे जुआरीनगर आणि आसपासच्या परिसरात अंमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com