Velsao Gram Sabha: वेळसाव ग्रामसभेचा मोठा निर्णय! मेगा प्रकल्पांच्या बांधकामावर बंदी; 'कचरा, पाणी आणि रस्त्यांची भेडसावतेय समस्या

Velsao Gram Sabha Resolution: ग्रामसभेने आपल्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रकल्पांच्या बांधकामासाठी परवाने देण्यावर तातडीने बंदी घालण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.
Velsao Gram Sabha Resolution
Large Scale ProjectsDainik Gomantak
Published on
Updated on

Velsao Gram Sabha Resolution: वेळसाव ग्रामसभेने नुकताच एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला. ग्रामसभेने आपल्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रकल्पांच्या बांधकामासाठी परवाने देण्यावर तातडीने बंदी घालण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. गावातील वाढत्या नागरी समस्यांना तोंड देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

पाणी, वीज आणि कचरा व्यवस्थापनाची समस्या

गेल्या काही वर्षांपासून वेळसावसह शेजारील गावांमध्ये नागरी समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कचरा व्यवस्थापनाचे गंभीर संकट, पाणी (Water) आणि वीज पुरवठ्याची अनियमितता, तसेच अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था यांसारख्या समस्यांनी गावकरी त्रस्त झाले आहेत. सध्याची पायाभूत सुविधा आणखी कोणत्याही मोठ्या विकासाचा भार पेलू शकत नाही.

Velsao Gram Sabha Resolution
Betora Gram Sabha: बेतोडा ग्रामसभा गाजली! विविध प्रश्‍नांवरुन खडाजंगी; कचरा प्रकल्पाच्या अर्धवट कामावरुन ग्रामस्थ आक्रमक

वाढत्या लोकसंख्येमुळे कचरा गोळा करण्याची आणि त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पाणी आणि विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे सामान्य जीवनमान विस्कळीत झाले आहे. तसेच, लहान आणि अरुंद रस्ते जड बांधकाम साहित्याच्या वाहनांसाठी योग्य नाहीत, ज्यामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे. या सर्व समस्या लक्षात घेता कोणताही नवीन मोठा प्रकल्प सुरु झाल्यास गावातील परिस्थिती आणखी गंभीर होईल, अशी भीती ग्रामस्थांना आहे. त्यामुळेच भविष्यातील संकटे टाळण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला.

सरकारच्या अभ्यासानंतरच बंदी उठणार

हा ठराव ग्रामसभा सदस्य संद्रा रॉड्रिग्ज यांनी मांडला, ज्याला संपूर्ण ग्रामसभेने पाठिंबा दर्शवला. या ठरावात असे स्पष्टपणे नमूद केले की, राज्य सरकार जोपर्यंत तिन्ही गावांच्या ‘कॅरिंग कॅपॅसिटी’ चा सर्वसमावेशक अभ्यास करत नाही, तोपर्यंत ही बंदी कायम राहील. याचा अर्थ सरकारी अहवालात गावातील पायाभूत सुविधांची क्षमता सिद्ध झाल्यानंतरच पुढील बांधकामांना परवानगी दिली जाईल.

Velsao Gram Sabha Resolution
Chandel Gram Sabha: 'अविश्वास' दर्शविण्यास बाऊन्सरसह आलेला पंच ग्रामस्थांकडून 'हायजॅक'

यावेळी बोलताना सरपंच मारिया डायना गौवेया यांनी ग्रामस्थांचे आणि आपल्या पंचायत सदस्यांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, "या निर्णयाचे स्वागत आहे. आपल्या गावांची नैसर्गिक संपत्ती, ओळख आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची हीच योग्य वेळ आहे." त्यांनी जलस्रोत, भातशेती, शेतजमिनी आणि आजूबाजूच्या टेकड्यांचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच, यापुढे कोणत्याही मोठ्या गृहनिर्माण किंवा व्यावसायिक प्रकल्पांसाठी परवानग्या दिल्या जाणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Velsao Gram Sabha Resolution
Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

इतर गावांनाही मिळणार प्रेरणा

हा निर्णय केवळ वेळसावसाठीच नव्हे, तर गोव्यातील इतर गावांनाही प्रेरणा देणारा आहे. अनेक गावे अनियंत्रित विकासामुळे (Development) अशाच प्रकारच्या समस्यांना तोंड देत आहेत. या ऐतिहासिक निर्णयामुळे ग्रामस्थांनी हे सिद्ध केले की, विकासाचा अर्थ केवळ इमारती बांधणे नव्हे, तर आपल्या पर्यावरणाचे आणि स्थानिक संस्कृतीचे संरक्षण करणे देखील आहे.

या ठरावाने विकासकांना आणि सरकारला एक स्पष्ट संदेश दिला की, स्थानिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल आणि त्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष करुन कोणताही मोठा प्रकल्प पुढे नेला जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com