Goa Vehicle Sales: गोव्यात दसऱ्याला वाहन खरेदीचा वेग मंदावला! नोंदणीत तब्बल 37.70 टक्क्यांची घट

Goa automobile sales market latest news: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्‍या दसऱ्यात वाहन खरेदी करण्‍यास गोमंतकीय नागरिकांचा अधिक कल असतो.
Goa vehicle registration statistics during festival season
Goa vehicle registrations drop by 37.70 percentDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्‍या दसऱ्यात वाहन खरेदी करण्‍यास गोमंतकीय नागरिकांचा अधिक कल असतो; परंतु गतवर्षीच्‍या तुलनेत यंदा मात्र दसऱ्याच्‍या काळात राज्‍यातील वाहन खरेदीत ३७.७० टक्‍क्‍यांनी तूट असल्‍याचे वाहतूक खात्‍याने दिलेल्‍या आकडेवारीतून समोर आले आहे.

गतवर्षी दसऱ्याच्‍या आठ दिवसांत ४,२२७ वाहनांची नोंदणी वाहतूक खात्‍याकडे झाली होती; पण यंदाच्‍या दसऱ्यात खात्‍याकडे केवळ २,८३१ वाहनांची नोंद झाल्‍याचे आकडेवारीतून दिसून येते. दसरा आणि दिवाळी पाडव्‍याच्‍या मुहूर्तावर घरी नवे वाहन आणण्‍याचे प्रत्‍येकाचे स्‍वप्‍न असते. त्‍यामुळे दसरा सणाच्‍या आठ दिवसांत वाहन खरेदीत वाढ होत असते; परंतु गतवर्षीच्‍या तुलनेत यंदाच्‍या दसऱ्यात मात्र गोमंतकीयांनी विविध कारणांमुळे वाहन खरेदीकडे पाठ फिरवल्‍याचे आकडेवारी सांगते.

Goa vehicle registration statistics during festival season
Goa Politics: निवडणुकीचे वारे वाहू लागले! भाजप घराघरांत, विरोधक मात्र एकीच्या प्रतीक्षेत

दरम्‍यान, दिवाळी पाडव्‍याच्‍या काळातही नागरिक वाहन खरेदीस पसंती देत असतात. त्‍यामुळे यंदाच्‍या पाडव्‍यात राज्‍यातील वाहन खरेदीत वाढ होईल, असा विश्‍‍वास वाहतूक खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना व्‍यक्त केला. दरम्यान, गतवर्षी १ एप्रिल ते २७ ऑक्‍टोबर या सात महिन्‍यांच्‍या कालावधीत वाहतूक खात्‍याकडे ११,१७४ वाहनांची नोंदणी झालेली होती. यंदा मात्र याच काळात ७,३९४ वाहनांची नोंद झाल्‍याचेही आकडेवारीतून दिसून येते. यातून गतवर्षीच्‍या तुलनेत यंदा जनतेने वाहने खरेदी करण्‍यास फारशी पसंती दाखवली नसल्‍याचे दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com