राज्यात मागील दोन आठवड्यापासून भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. राज्यात दिवसेंदिवस भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढच होत आहे. कांदा आणि बटाट्याचे दर सोडल्यास इतर भाज्यांचे दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
पणजी बाजारात टॉमेटो 50 रूपये प्रती किलो दराने विकला जात आहे तर लसूण 400 ते 450 रूपये प्रती किलो दराने विकला जातोय. लसूणाची आयात घटल्याने मोठ्या प्रमाणात लसणाच्या किंमतीत वाढ झाल्याचे विक्रेते सांगतात.
आल्याचा दर प्रतिकिलो 150 ते 200 रुपये झाला आहे. हिरवी मिरची, वालपापडी, भेंडी, तसेच पालेभाज्यांचे दरदेखील वाढत आहेत.
गोव्यात येणारा भाजीपाला हा बेळगाववरून येत असल्याने तेथील भाजी मार्केटमध्ये तुटवडा आल्यास त्याचा फटका गोव्याला बसतो;
कारण गोव्यात भाजी आणण्यासाठी लागणारी मजुरी, वाहतूक खर्च यामुळे येथे भाज्यांचे दर वाढवावे लागतात.
एरव्ही या फेब्रुवारी ते मार्च-एप्रिल दरम्यान भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत नसे परंतु यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे विक्रेते सांगतात.
राज्यात रात्री काहीप्रमाणात थंडी आणि दिवसा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उष्म्यापासून गारवा मिळावा यासाठी लिंबुपाणी, लिंबुसरबाताचा नागरिक आसरा घेतात परंतु त्यांच्या दरातही वाढ झाली असून उत्तम दर्जाचे मध्यम आकाराचा लिंबू पाच रूपये प्रती नग विकला जातोय.
भाजी खुल्या बाजारातील दर, फलोत्पादन महामंडळाचे दर
कांदा- ४०----------२६
बटाटा - ४०-------- ३०
टोमॅटो - ५०----------३८
गाजर - ५०-६०------- ३६
फ्लॉवर ४०----------३३
भेंडी - ८०--------- ५७
कोबी - ४०---------- २९
हिरवी मिरची - ८०------ ६८
लसूण ४०० ते ४५०------ ४३७
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.