Tomato Price Hike : टोमॅटो अजूनही खातोय ‘भाव’; बटाटा, भेंडी पालेभाज्यांच्या दरांतही मोठी वाढ

पालेभाज्‍याही कडाडल्‍या; दर आणखी वाढणार
Tomato Price Hike
Tomato Price HikeDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji : लांबलेल्या पावसाचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर झाला लागला आहे. त्यामुळे शेजारील राज्यांतून म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या भाजीपाल्याचे दर वधारले आहेत. टोमॅटो तर अजूनही भाव खात आहे. 100 ते 110 रुपये प्रतिकिलो असा त्‍याचा दर आहे.

जीवनावश्‍यक वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. महागाईने सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय नागरिकांचे खिसे रिकामे केले आहेत. भाजीपाल्याच्या दरांतही मोठी वाढ झालीय. कांदा, बटाट्याचे दर गेल्या महिन्यापासून स्थिर आहेत, पंरतु टॉमेटो व फळभाज्‍यांचे दर अजूनही खाली आलेले नाहीत. येत्या काळात ते आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे विक्रेते सांगतात.

पणजी मार्केटमध्ये गावठी भाजी, भाजीची केळी, फणस आदींना देखील चांगली मागणी आहे. राज्यात भाज्यांची आवक घटल्‍याने टॉमेटो, शिमला मिरची, बेनीसच्‍या दरात 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्‍यान, गोवा फलोत्पादन मंडळाच्‍या दुकानांत टोमॅटोचा दर 100 रुपये आहे.

भाजी प्रतिकिलो

  • टोमॅटो : 110

  • कांदा : 30

  • बटाटा : 40

  • कारली : 80

  • भेंडी : 60

  • कोबी : 40

  • फ्लॉवर : 40

Tomato Price Hike
Panaji Smart City - पणजीच्या 'स्मार्ट बस स्टॉप'वर छप्पर नाही | Gomantak TV

पालेभाजी प्रतिजुडी

  • मेथी : 20

  • लालभाजी : 20

  • कांदापात : 20

  • पालक : 10

  • शेपू : 10

  • कोथंबीर : 25

  • पुदीना : 10

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

High Fish Rates In Goa
Goa Food Price Increase
Commercial LPG Price Hike
Air India Ticket Prices To Rise
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com