Goa ZOIL Fuel Leak: चिखलीतील इंधन गळतीबाबत ‘गोवा प्रदूषण’चा खुलासा; मात्र माजी सरपंचांचा फसवणूकीचा आरोप

Goa Fuel Leak Issue: झुआरी इंडियन ऑईल अदानी व्हेन्चर कंपनीच्या वाहिनीतून पेट्रोल-डिझेल मिश्र इंधन विहिरीत पाझरत नसल्याचा खुलासा गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे.
Fuel leak In Goa
Fuel leak In GoaDainik Gomantak

Goa Fuel Leak Issue: दाबोळी-चिखलीतील माटवे-व्हडले भाटात झुआरी इंडियन ऑईल अदानी व्हेन्चर कंपनीच्या भूमिगत वाहिनीतून पेट्रोल-डिझेल मिश्र इंधन, चिखली-व्हडले भाट परिसरात भूमिगतरीत्या विहिरीत, नाल्यात, शेतजमिनीत पाझरत नसल्याचा खुलासा गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने माहिती हक्क कायद्याखाली केला आहे.

व्हडले भाट परिसरातील विहिरीत एनेनाफथिलीन हा पदार्थ आढळला आहे. या पदार्थातून प्लास्टिक तयार होते, अशी माहिती गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली असल्याचे चिखली पंचायतीचे माजी सरपंच प्रताप म्हार्दोळकर यांनी सांगितले.

Fuel leak In Goa
Goa Online Frauds: चोरी, ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ; तीन घटनांमध्ये 20 लाखांहून अधिक रकमेचा गंडा

व्हडले भाट परिसरात इंधन साठा नसल्याचा खुलासा गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने करून जनतेच्या डोळ्यांत धूळफेक केली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

दरम्यान, माहिती हक्क कायद्याखाली झुआरी इंडियन ऑईल अदानी व्हेन्चर कंपनीच्या भूमिगत इंधन वाहिनीतून इंधन गळती झाल्याप्रकरणी, या कंपनीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही, अशी माहिती गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे.

मात्र, या कंपनीच्या विरोधात दोन तक्रारी वास्को पोलिसांत दाखल करण्यात आल्याचे माजी सरपंच प्रताप म्हार्दोळकर यांनी सांगितले.

Fuel leak In Goa
Super Cup Football: बंगळूरला एका गोलने नमवत एफसी गोवाचा निसटता विजय

नोव्हेंबरपासून इंधन गळती!

झुआरी इंडियन ऑईल अदानी व्हेन्चर कंपनीच्या भूमिगत इंधन वाहिनीला छेद पडून पेट्रोल - डिझेल मिश्र इंधन पाझरत दाबोळी-चिखली व्हडले भाट परिसरातील विहिरीत, नाल्यांत, शेतजमिनीत व इतर ठिकाणी पोहोचले आहे.

नोव्हेंबर 2023 मध्ये इंधन गळती सुरू झाली होती, ती अजूनही सुरूच असल्याचे प्रथमदर्शनी पाहिल्यानंतर नजरेस पडते.

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने माहिती हक्क कायद्याखाली विहिरीत एनेनाफथिलीन पदार्थ आढळल्याचे सांगितले.

तसेच विहिरीत फ्लोरेन, अँथरेसीन, पॅन्थारीन, फ्लोतेरीन आणि प्येरनी पदार्थांचा साठा मिळाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले आहे.

एनेनाफथिलीन पदार्थापासून प्लास्टिकच्या वस्तू बनविल्या जातात. हा पदार्थ आरोग्यास घातक आहे.

- प्रताप म्हार्दोळकर, माजी सरपंच

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com