Sankalp Amonkar: जेएसडब्ल्यू कंपनीने मच्छीमारांना मोटर देण्यासाठी सीएसआर कार्यक्रम राबविला याचा अर्थ असा नाही की मी मुरगाव बंदरात कोळसा हाताळणीसाठी समर्थन देत आहे.
एमपीटीमध्ये कोळसा प्रदूषण होऊ देणार नाही या भूमिकेवर आपण अजूनही ठाम आहे आणि स्थानिक रहिवाशांवर प्रदूषणाचा प्रभाव रोखण्यासाठी कोळसा हाताळणी नियंत्रणात आणणे आवश्यक असल्याचे बंदरातील कंपन्यांना आधीच कळविले आहे, असे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी आज स्पष्ट केले.
रवींद्र भवन बायणा येथे विदा वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या हस्ते काल जेएसडब्ल्यूद्वारे सीएसआर उपक्रमांतर्गत येथील 32 मच्छीमारांना 1.5 लाख रुपये किंमतीच्या मोटर वितरित करण्यात आल्या. याविषयी आमदार संकल्प आमोणकर यांच्यावर सोशल मीडियाद्वारे टीकेची झोड उठली होती.
सीएसआर उपक्रमांतर्गत मोटर वितरण केले, पण यात कोळसा प्रदूषणाबाबतच्या भूमिकेत गोंधळ होऊ नये असे आमोणकर यांनी स्पष्ट करताना आपण कोळसा प्रदूषण होऊ देणार नाही याची दखल घेतली आहे.
तसेच माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे. स्थानिक रहिवाशांवर प्रदूषणाचा प्रभाव रोखण्यासाठी कोळसा हाताळणे नियंत्रणात आणणे आवश्यक असल्याचे बंदरातील कंपन्यांना आधीच कळविले असल्याचे ते म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.