गोव्याच्या वारकऱ्यांनी पंढरपूर विठ्ठल मंदिर व चंद्रभागेच्या तिरी केली स्वच्छता, 16 बॅग कचरा केला गोळा
Goa Varkari In Pandharpur

गोव्याच्या वारकऱ्यांनी पंढरपूर विठ्ठल मंदिर परिसर व चंद्रभागेच्या तिरी केली स्वच्छता, 16 बॅग कचरा केला गोळा

Goa Varkari In Pandharpur: यावर्षी रविवारी सकाळी स्वच्छतेस सुरुवात झाली. दुपारपर्यंत पंधरा-सोळा बॅग भरून कचरा गोळा करण्यात आला.
Published on

साळ: श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय - मेणकुरे गोवातर्फे २१ व २२ डिसेंबर रोजी पंढरपूर येथे मंदिर परिसर व चंद्रभागेच्या तिरी स्वच्छता मोहीम झाली. यावेळी पंढरपूर वाल्मिकी समाजाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव उपस्थित होते.

ते म्हणाले की, प्रत्येक भाविकाने भक्तीबरोबर पंढरपूरच्या स्वच्छतेस प्राधान्य दिले पाहिजे. मंदिर व चंद्रभागेचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, प्रशासन काळजी घेते, साधन सुविधा पुरविते परंतु दररोज हजारोंच्या संख्येने येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांमुळे गर्दी वाढते व त्यातून अस्वच्छतेचे, गलिच्छपणाचे प्रकार वाढतात असे पुढे म्हणाले .

गोव्याच्या वारकऱ्यांनी पंढरपूर विठ्ठल मंदिर व चंद्रभागेच्या तिरी केली स्वच्छता, 16 बॅग कचरा केला गोळा
Goa Temple: गोव्याच्या गावागावांतील मंदिरे, संस्कृती ही भूषणावह! मंदिरात दडलेल्या असतात लोकांच्या भावना

श्री पुंडलिक देवस्थानचे पुजारी व अध्यक्ष यांनीही विचार मांडले. ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय मेणकुरेचे अध्यक्ष देवानंद नाईक यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रकाश सांगोडकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर संस्थेचे सचिव चंद्रकांत वंसकर यांनी आभार मानले.

यावर्षी रविवारी सकाळी स्वच्छतेस सुरुवात झाली. दुपारपर्यंत पंधरा-सोळा बॅग भरून कचरा गोळा करण्यात आला. वारकऱ्यांनी संध्याकाळी श्री विठोबाचे दर्शन घेतले. या मोहिमेत सुमारे १०० वारकऱ्यांनी भाग घेतला. प्रामुख्याने दादू नाईक, धोंडू मुळगावकर, प्रकाश रामनाथकर, सदाशिव नाईक, नकूळ नाईक, मिलिंद नाईक, नागेश नाईक, शंभू गावस, नंदकुमार शेटये तसेच सुषमा नाईक, लक्ष्मी नाईक सह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या व सोमवारी सर्व वारकरी मोहीम आटोपून गोव्यात मूळ गावी परतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com