"मला गेमिंगची आवड, पण कुणी समजून घेत नाही"? वाळपईच्या विद्यार्थ्याने थेट साधला PM मोदींशी संवाद; पंतप्रधांनांनी दिला मोलाचा सल्ला

Shrijit Gadgil Pariksha Pe Charcha: वाळपईच्या शाळेतील नववीतील विद्यार्थी श्रीजीत वैभव गाडगीळ याने थेट प्रत्यक्षात भेट घेऊन पंतप्रधान मोदींशी संवाद साधला.
Narendra Modi, Pariksha Pe Charcha
Narendra Modi, Pariksha Pe CharchaDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई : आपल्याला बालपणापासून गेमिंगची खूपच आवड असून त्यासाठी घरच्यांचे सहकार्य हवे तसे मिळत नाही. त्यासाठी जीवनात यश कसे साध्य करू, असा सवाल करत वाळपईच्या डॉ. के.ब. हेडगेवार शाळेतील नववीतील विद्यार्थी श्रीजीत वैभव गाडगीळ याने थेट प्रत्यक्षात भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधला व मोदींकडून जीवनातील यशाचा मार्ग जाणून घेतला.

‘परीक्षा पे चर्चा’ या परस्पर संवादी उपक्रमांतर्गत गोव्यातून इयत्ता नववीत शिकणाऱ्या कु. श्रीजीत वैभव गाडगीळ याची निवड झाली होती. पंतप्रधान मोदींनी श्रीजीतशी संवाद केला. ते म्हणाले तुला जर घरातून, गावातून तुझ्या कलेला प्रतिसाद हवा असेल तर तुझे स्वत:चे व्हिडीओ चॅनेल सुरू कर. एखादी गेम त्या माध्यमातून तयार करून अपलोड कर.

त्यातून तुझ्या कलेला दाद लोकांकडून नक्कीच मिळेल, आई वडील तुझ्या कामाविषयी निश्चित खात्री बाळगतील. आजच्या काळात गेमिंग हे केवळ मनोरंजन नाही. तर त्यातून आत्मनिर्भर बनण्याचा मार्ग होऊ शकतो. ते कौशल्य आत्मसात कर. त्यातून तुझे चांगले उज्ज्वल भविष्य घडणार आहे, असा सल्लाही मोदींनी व्यक्त केला.

Narendra Modi, Pariksha Pe Charcha
Pariksha Pe Charcha 2025: परीक्षा एक उत्सव! गोव्यात मुख्यमंत्र्यांसह 800 विद्यार्थ्यांनी पाहिला मोदींचा 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम

संपूर्ण गोव्यातून प्रत्येक शाळेतील दोन विद्यार्थ्यांना आपल्या प्रश्नांवर छोटे व्हिडिओ करून एससीईआरटी संस्थेला पाठवायचे होते. त्या सर्वांमधून श्रीजीत गाडगीळची निवड झाली. कु.श्रीजीत गाडगीळ यांचे डाॅ.के.ब.हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळ, स्थानिक व्यवस्थापन मंडळ व पालक शिक्षक संघ आणि सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Narendra Modi, Pariksha Pe Charcha
Pariksha Pe Charcha: पीएम मोदी करणार 'परीक्षा पे चर्चा', करोडो विद्यार्थ्यांना स्वतः परीक्षेच्या टिप्स देणार

जुगारासारख्या गोष्टी नकोत!

गेमिंगव्दारे तुझी निर्णय घेण्याची गती वाढेल. त्यातून विचार प्रगल्भ बनून तुझे करियर घडणार आहे. केवळ टाईम पास करण्यापेक्षा गेमिंगला तुझे करियर बनवावे. भारतीय संस्क्ुती महान असून पौराणिक, आध्यात्मिक कथेवर स्वत:चे खेळ तयार कर. जुगारासारख्या गोष्टी गेममधून होऊ नयेत, असा मोदींनी श्रीजीत गाडगीळला सल्ला दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com