Goa Traffic Police: दोन दिवसांपूर्वी झालेल्या वागातोर येथील अपघातानंतर रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस अलर्ट मोडवर असून सणासुदीच्या काळात अपघात रोखण्यासाठी पोलीस पथक कसोशीने प्रयत्न करत आहे.
त्यातच आता हणजूण ट्राफिक पोलिसांनी गोव्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना अपघात टाळण्यासाठी आवाहन वजा इशारा दिलाय. यासंबंधी वाहतूक पोलीस गौरीश परब यांनी गोमंतकसोबत संवाद साधला.
गोव्यात फिरताना मद्यपान करून वाहन चालवणे हा गुन्हा आहे. मोटार वाहन नियम आणि कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनीआखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणार्या व्यक्तींना त्यांच्या कृतीचे परिणाम भोगावे लागतील, तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध खटले दाखल करण्यात येतील.
याप्रकरणी कोणतीही हयगय केली जाणार नसून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा रद्द करण्यात येईल अशा इशारा वाहतूक पोलीसांकडून देण्यात आलाय.
पर्यटकांना गोव्यातील वातावरणाचा आनंद घेता यावा यासाठी प्रशासन सज्ज असून येणाऱ्या पर्यटकांनी सुद्धा इथल्या नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. हुल्लडबाजी करत, दारू पिऊन अपघात घडवणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड इशाराही त्यांनी दिलाय.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.