पणजी: गोव्यात (Goa) लसीकरणाला (Vaccination) मोठा प्रतिसाद मिळत असून आज 17,569 एवढे लसीकरण आज झाले. त्यामुळे राज्यातील एकूण लसिकरण 8 लाख,54 हजार 193 एवढे झाले. आज दिवसभरात 16,291नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस तर 1278 नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात आतापर्यंत ८ लाख ५४ हजार 193 एवढे लसीकरण पूर्ण झाले. यात 6,37,111 लोकांनी पहिला डोस तर 1, 08 541 लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
दरम्यान, गोव्याने पाठवलेल्या 122 कोरोना सॅम्पल मधील 40 सॅम्पल आज आले. ज्या त 38 डेल्टा व्हेरीएंट (Delta variant) व दोन काप्पा व्हेरिएंट असल्याचे स्पष्ट झाले आहे. आत्तापर्यंत गोव्याने पाठवलेल्या एकूण 122 सॅम्पल मधील एकूण 73 सॅम्पलचे अहवाल आले असून त्यामध्ये एकूण 64 डेल्टा व्हेरिएंट व 9 काप्पा व्हेरियेंट असल्याचे स्पष्ट झाले आहेत. अद्यापही 49 सॅम्पलचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. यापूर्वी पुण्याहून ३३ सॅम्पलचे रिपोर्ट आले होते. त्यामध्ये डेल्टाचे 26 व काप्पाचे 7 अहवाल आले होते. सध्या गोव्यात 64 डेल्टा व्हेरिएंट व 9 काप्पा व्हेरिएंट असून ब्लॅक फंगसचे (black fungus) 14 रुग्ण आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.