Goa: उद्यापासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू

Goa: Vaccination drive for 18 44 to start from Saturday
Goa: Vaccination drive for 18 44 to start from Saturday
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्यातील(Goa) 18 ते 44 वर्षे (18-44) वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण(Vaccination) 15 मे 2021 पासून सुरू होणार आहे.  राज्यातील 35 आरोग्य केंद्रांमध्ये(health center) हे लसीकरण सुरू होणार आहे. ‘कोविन’(Covin) या पोर्टलवर नोंदणी केलेल्या 18 ते 44 वर्षे वयोगटाोतील नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे.   सध्या राज्यामध्ये सुरू असलेले 45 वर्षांवरील नागरिकांसाठीचे लसीकरणही सुरू राहणार आहे.  त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत(CM Pramod Sawant) यांनी केले आहे. (Goa: Vaccination drive for 18 44 to start from Saturday) 

सर्व शिक्षक फ्रंटलाईन वर्कर्स
गोवा राज्यातील सरकारी  व अनुदानित शाळांचे  शिक्षक व कर्मचारी यांना कोविड फ्रंटलाईन वर्करमध्ये समावेश करण्यात आला आहे. शिक्षण खात्याचे संचालक दिलीप भगत यांनी आज याबाबत परिपत्रक काढले आहे. शाळांतील शिक्षक व इतर सर्व कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देण्यात आला असून त्यांना लसीकरण व इतर सोयींचा लाभ प्राधान्याने मिळणार आहे.

दरम्यान गोव्यात केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या प्राणवायूच्या साठ्यात वाढ करण्याची विनंती राज्य सरकारने केली आहे. आणि ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स घेऊन दोन विमाने काल गोव्यात दाखल झाली आहे. सध्या 26 मेट्रिक टन साठा मिळत असून तो 41 मेट्रिक टन देण्याची मागणी करण्यात येत असून त्याचा वारंवार आढावा घेतला जात आहे, अशी माहिती आरोग्य सचिव रवी धवन यांनी दिली. केंद्रानेही हा साठा लवकरात लवकर राज्य सरकारला द्यावा, असे निर्देश खंडपीठाने दिले. स्कूप इंडिस्ट्रीजतर्फे ॲड. विवेक रॉड्रिग्ज यांनी केंद्र सरकारचा साठा मिळवण्यासाठी राज्य सरकारला व्यवस्था करण्यास सांगावे अशी बाजू मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

goa burglaries festive season crime news
bicholim marigold flower cultivation
honda gram sabha mining opposition
verna police station Sexual Assault case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com