Bicholim Samrat Club
Bicholim Samrat ClubDainik Gomantak

Goa Updates: 'कलाकारांचे पाय नेहमीच जमिनीवर असावेत'

विश्वजीत फडते: मा. दत्ताराम वळवईकर नाट्यमहोत्सवात डिचोली सम्राट क्लबतर्फे नाटक
Published on

डिचोली: कलाकार कितीही उच्च शिखरावर पोचला, तरी त्याचे पाय जमिनीवरच असायला हवेत, असे स्पष्ट मत नाट्य आणि टीव्ही कलाकार विश्वजीत फडते यांनी व्यक्त केले. 24 व्या मा. दत्ताराम वळवईकर नाट्यमहोत्सवाअंतर्गत डिचोली सम्राट क्लबतर्फे आयोजित नाट्यप्रयोगाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. मा. दत्ताराम वळवईकर यांच्‍यासारख्या कलाकारांनी मराठी रंगभूमी समृद्ध केली, असे गौरवोद्‌गारही फडते यांनी काढले.

Bicholim Samrat Club
मडगावच्या कचरा समस्येवर मात करण्यासाठी नवीन प्रकल्पांची घोषणा

साखळीच्या रवींद्र भवनात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यावेळी पर्यटन विकास खात्याचे अधिकारी तथा सम्राट क्लब राज्यचे पदाधिकारी दीपक नार्वेकर, शैलेश बोरकर, गौतम खरंगटे, प्रसाद नाईक, शेखर नाईक, डिचोली सम्राट क्लबचे अध्यक्ष शिवदास कवठणकर, सचिव सत्यवान नाईक, यदुनाथ शिरोडकर, रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष विठोबा घाडी आदी मान्‍यवर उपस्थित होते.

दीपक नार्वेकर आणि शैलेश बोरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. शिवदास कवठणकर यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. प्रवीण सावंत यांनी स्वागत केले तर सत्यवान नाईक यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com