
Unknown Body Found in Tambdi Surla: रविवारी तांबडीसुर्ला येथील धबधब्याच्या पाण्यात एक अज्ञात व्यक्तीचा कुंजलेला व नग्न्न अवस्थेत मृतदेह आढळुन आला. कुळे पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह बांबोळी येथे शवचिकित्सा करण्यासाठी पाठविला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 10 वाजता मोले वन खात्याकडुन धबधाब्याच्या पाण्यात एक मृतदेह तरंगत असल्याचा दूरध्वनी आला.
त्यानंतर कुळे पोलीस निरीक्षक सगुण सावंत याच्या मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक विभावरी गांवकर आपल्या पोलीस फौज समवेत घटनास्थळी दाखल होत त्याठिकाणी शोधाशोध केला असता त्यांना मृतदेह दृष्टीस पडला. कुळे पोलिसांनी हा मृतदेह पाण्यातुन बाहेर काढून पंचनामा करून बांबोळी येथे शवचिकित्सा करण्यासाठी पाठवला आहे. पुढील तपास कुळे पोलीस करीत आहे.
हा मृतदेह कर्नाटक राज्यातील असण्याची शक्यता असून सध्या राज्यातीस पोलिस स्थानकांत कुणीही बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद झालेले नाही. या मृतदेहाचे वय अंदाजे 30 ते 40 असण्याची शक्यता आहे. संपूर्ण मृतदेह कुजलेला व नग्न अवस्थेत होता. कर्नाटक राज्यातील पोलीस स्थानकांत कुणी हरवला आहे का याची पडताळणी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.