Panaji News : मनोहर पर्रीकरांना गोवा विद्यापीठाची मानवंदना

Panaji News : आलेक्स सिक्वेरा : ‘मनोहर पर्रीकर कायदा, प्रशासन महाशाळे’च्या इमारतीचे उद्‌घाटन
goa University
goa University Dainik Gomantak
Published on
Updated on

Panaji News : पणजी, माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी शिक्षणाला सदोदित प्राधान्य दिले. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भवितव्य आहेत, हे त्यांनी जाणले होते.

गोवा विद्यापीठाने कायदा आणि प्रशासन विभागाच्या इमारतीला मनोहर पर्रीकरांचे नाव देऊन त्यांना मानवदंना दिल्याचे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले.

गोवा विद्यापीठात मनोहर पर्रीकर कायदा, प्रशासन, सार्वजनिक धोरणे महाशाळेच्या इमारतीच्या उद्‌घाटनसमयी सिक्वेरा बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन, कुलसचिव विष्णू नाडकर्णी, शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर आदी मान्यंवर उपस्थित होते.

goa University
Vasco News - वालेस जंक्शनजवळ सापडली झुआरी कंपनीची पाईपलाईंन लिकेज | Gomantak TV

दरम्यान, सिक्वेरा म्हणाले की, पर्रीकर हे जंटलमेन होते. त्यांनी आपल्या मर्यादेबाहेर जाऊनही जनतेची सेवा केली. या इमारतीत शिकून अनेक प्रशासकीय अधिकारी तयार होतील, अशी आशा आहे. विद्यार्थ्यांनी पर्रीकरांच्या नेतृत्वगुणांची माहिती करून घ्यावी.

२०.७८ कोटींचा खर्च

मनोहर पर्रीकर कायदा, प्रशासन, सार्वजनिक धोरणे या इमारतीच्या बांधकामासाठी राज्य सरकारद्वारे २२ कोटींची तरतूद करण्यात आली होती. ही इमारत ५५८० चौ.मी. क्षेत्रफळात उभारण्यात आली असून इमारतीच्या बांधकामासाठी एकूण २०.७८ कोटी रुपये खर्च आला आहे. या इमारतीत एकूण १८ वर्ग, ३९ प्राध्यपक कार्यालये, ३ डीन कार्यालये, कॉमन रूम -२ व इतर साधनसुविधा उपलब्ध आहेत.

या इमारतीसाठी गोवा शासनाने आर्थिक सहकार्य केले आहे. या महाशाळेत सार्वजनिक धोरणाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने शिक्षण दिले जाईल. तसेच वेगळे बी.ई.इन बायो इंजिनियरिंगचे शिक्षण दिले जाणार आहे. आम्ही विद्यापीठात रिसर्च पार्क (संशोधन उद्यान) करण्याच्या प्रक्रियेला सुरवात केली आहे.

- प्रो. हरिलाल मेनन, कुलगुरू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com