Goa University: विद्यापीठाच्या कुलसचिवपदी प्रा. धुरी यांची नियुक्ती निश्‍चित

Goa University Register: कुलपती या नात्याने राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी या नावाला पसंती दिली
Goa University news
Goa University newsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa University News: गोवा विद्यापीठाच्या कुलसचिवपदी प्रा. सुंदर धुरी यांची नियुक्ती होणे आता निश्चित झाले आहे. कुलपती या नात्याने राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी या नावाला पसंती दिली की येत्या आठवडाभरात घोषणा केली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

कुलसचिवपदावरून आपल्‍याला मुक्त करण्यात यावे अशी मागणी प्रा. व्ही. एस. नाडकर्णी यांनी गोवा विद्यापीठाकडे केली होती. मात्र त्यांना नवा कुलसचिव नियुक्त होईपर्यंत काम करण्यास सांगण्यात आले होते. विद्यापीठ भरतीत परप्रांतीयांना संधी देण्यात येत असल्याचा आरोप होत असतानाच कुलसचिवपदी कोण येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या पदासाठी जाहिरात देण्यात आली होती. त्यासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती.

त्यातून अंतिम यादीत प्रा. रामराव वाघ, प्रा. सुंदर धुरी यांची नाव पोचली होती. वाघ हे अद्याप आम आदमी पक्षाचे सदस्य आहेत.

Goa University news
Goa University : गोवा विद्यापीठातही Job Scam! समित्यांमध्ये केरळीयनांची नियुक्ती; गोवा फॉरवर्डचा घणाघात

त्यामुळे कदाचित त्यांचे नाव मागे पडले असावे. प्रा. धुरी यांच्या नावावर निवड समितीने आपली मोहोर उमटवली आहे. कुलपतींची मान्यता मिळाल्यानंतर त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल.

ही नियुक्ती पाच वर्षांसाठी असून त्यास मुदतवाढ देण्याची तरतूद आहे. १५ नोव्हेंबर रोजी या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार १६ डिसेंबरपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. कुलगुरू हरिलाल मेनन यांच्या अध्यक्षतेखालील समिती कुलसचिवांची निवड करणार होती.

संशोधन क्षेत्रात मौलिक कामगिरी

प्रा. सुंदर धुरी हे गोवा विद्यापीठाच्या रसायनशास्‍त्र विभागातील अकार्बनिक रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांनी गोवा विद्यापीठातून विद्यावाचस्पती पदवी घेतली आहे. सध्या ते विभागाचे उपअधिष्ठाता (अकादमिक) म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संशोधन क्षेत्रात समन्वय यौगिके, संश्र्लेषणात्मक अकार्बनिक रसायनशास्त्र आणि प्रेरित उत्प्रेरक क्रिया अशी कामगिरी आहे. त्यांचे संशोधन ६५ पेक्षा जास्त प्रकाशनांमध्‍ये प्रकाशित झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com