Goa: उमा साळगावकरांची सरपंचपदी बिनविरोध निवड

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Deputy Chief Minister Babu Azgawkar) व महिला भाजपा सरचिटणीस शिल्पा नाईक (Shilpa Naik) यांनी अभिनंदन केले.
Uma Salgaonkar & Deputy Chief Minister Babu Azgawkar
Uma Salgaonkar & Deputy Chief Minister Babu AzgawkarDainik Gomantak
Published on
Updated on

कोरगावच्या नवनिर्वाचित सरपंच उमा साळगावकर (Uma Salgaonkar) यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्यामुळे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Deputy Chief Minister Babu Azgawkar) व महिला भाजपा सरचिटणीस शिल्पा नाईक (Shilpa Naik) यांनी अभिनंदन केले.

पेडणे शाशकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला महिला भाजपा मोर्चा नवनिर्वाचित अध्यक्षा निकिता तोरस्कर ,प्रदेश सरचिटणीस शिल्पा नाईक, पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास नाईक , सरचिटणीस तथा पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर ,नगरसेविका तृप्ती सावळ देसाई ,कोरगाव माजी सरपंच प्रमिला देसाई , माजी सरपंच सिद्धी शेट्ये ,हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर , तोरसे जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे , धारगळ जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर , चांदेल सरपंच संतोष मळीक ,भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षा नयनी शेटगावकर आदी उपस्थित होते.

Uma Salgaonkar & Deputy Chief Minister Babu Azgawkar
Goa : मांद्रे विकासाला मोठा हातभार : आमदार दयानंद सोपटे

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बोलताना महिला शक्ती दिवसेंदिवस वाढत आहे , सामाजिक सांस्कृतिक , शैक्षणिक राजकीय क्षेत्रात महिलांनी आघाडी घेतलेली आहे. पंचायत पातळीवरील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी आपापल्या गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावे त्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल असे सांगितले. महिला भाजपा सरचिटणीस शिल्पा नाईक , नयनी शेटगावकर , उषा नागवेकर ,सीमा खडपे , आदींनी शुभेच्छा दिल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com