Tourist dies in Goa: मित्रांसोबतची गोवा ट्रीप ठरली अखेरची; चौथ्या मजल्यावरुन कोसळून 27 वर्षीय आसामच्या पर्यटकाचा मृत्यू

Assam tourist accident Goa: दोन दिवस गोव्यात पर्यटनाचा आनंद लुटल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली.
Goa Death News
Tragic DeathDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: मित्रांसोबत गोवा ट्रीपसाठी आलेल्या पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आसामचा २७ वर्षीय पर्यटक वागातोर येथील अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळला. गंभीर जखमी झालेल्या या पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (०५ डिसेंबर) सायंकाळी वागातोर येथे ही घटना घडली.

आयुषमान केशनन (वय २७, रा. आसाम) असे या मृत पर्यटकाचे नाव आहे. आयुषमान त्याच्या इतर दोन मित्रांसोबत मंगळावारी गोव्यात पर्यटनासाठी आला होता. त्याने मित्रांसोबत वागातोर येथे अपार्टमेंट भाड्याने घेतले होते. त्याच्यासोबत असणारा एक मित्र नोएडा आणि दुसरा बंगळुरु येथील रहिवासी आहे.

Goa Death News
Mapusa: ..तोडगा काढा अन्यथा काळे झेंडे दाखवू! म्हापसा व्यापारी संघटनेचा इशारा; आमदारांसह सरकारला दिला अल्टिमेटम

दोन दिवस गोव्यात पर्यटनाचा आनंद लुटल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली. आयुषमान अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळला. यात त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला तत्काळ म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले पण, उपचार सुरु करण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.

Goa Death News
Omkar Elephant: ..नंतर कायदा हातात घेतला तर दोष देऊ नका! उगवेवासीयांचा इशारा; 'ओंकार'चा बंदोबस्त करण्याची केली मागणी

आयुषमान केशनन याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला असून, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सोपस्कर पूर्ण उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, हणजूण पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. आयुषमान चौथ्या मजल्यावरुन खाली कसा कोसळला याचा तपास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com