Trinamool Congress: गोव्यात महिला सुरक्षिततेच सक्षमीकरण कागदावरच

Trinamool Congress: भाजप सरकार केवळ कादावर महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देते.
Trinamool Congress | Kakoli Ghosh Dastidar
Trinamool Congress | Kakoli Ghosh DastidarDainik Gomantak
Published on
Updated on

Trinamool Congress: भाजप सरकार केवळ कादावर महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देते. आज गोव्यात महिला सुरक्षित नाही. अल्पवयीन मुलींवर देखील लैंगिक अत्याचार होण्याच्या घटना घडत असून यासाठी सरकार जबाबदार आहे, असा हल्लाबोल तृणमूल काँग्रेसच्या खासदार तथा महिला विभागाच्या प्रमुख डॉ. काकोली घोष दस्तीदार यांनी केला.

पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी तृणमूलचे गोवा प्रभारी कीर्ती आझाद व इतर मान्यवर उपस्थित होते. 2016 पासून दरवर्षी किमान 60 बलात्काराच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. गेल्या सहा वर्षांत गोव्यात सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडल्या असून जानेवारी 2016 पासून राज्यात 387 प्रकरणे नोंदली गेली आहेत.

Trinamool Congress | Kakoli Ghosh Dastidar
Goa News: क्रिकेट निवडणुकीतही रंगला राजकीय फड!

अलीकडील प्रकरणांमुळे सरकारचा कमकुवतपणा उघड झाला आहे. पोलिस आणि राज्य यंत्रणेचा बेफिकीरपणा अनेक घटनांमधून समोर आला आहे. ‘तथाकथित’ सुरक्षित राज्यात महिलांची छेडछाड, बलात्कार झाल्यानंतर त्यांची हत्या केली जाते आणि या सर्व प्रश्नांवर सरकार गप्प आहे, अशी टीका डॉ. दस्तीदार यांनी केली.

'बेरोजगारी रोखण्यात भाजप अपयशी'

सरकारच्या अकार्यक्षम धोरण अंमलबजावणीमुळे गोव्यातील महिलांचे कल्याण आणि सुरक्षा बिघडली आहे. गोवा महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सुरक्षेमध्ये पिछाडीवर आहेत. भाजप सरकारच्या काळात बेरोजगारीचा दर दुहेरी आकड्यात असूनही राज्यातील वाढती बेरोजगारी रोखण्यात भाजप अपयशी ठरला आहे, असे तृणमूल काँग्रेसच्या खासदार तथा महिला विभागाच्या प्रमुख डॉ. काकोली घोष दस्तीदार म्हणाल्या.

Trinamool Congress | Kakoli Ghosh Dastidar
Goa News: 'मोपा'ला लागलेय उद्‍घाटनाचे वेध

डॉ. काकोली घोष दस्तीदार, तृणमूल काँग्रेसच्या खासदार तथा महिला विभागाच्या प्रमुख-

विधानसभा निवडणुकीवेळी आम्ही म्हटले होते की, काँग्रेसला मतदान करणे म्हणजे गोव्यात भाजपला मतदान करण्यासारखेच आहे. काँग्रेसच्या आठ आमदारांनी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केल्याने हे स्पष्ट झाले आहे. त्यांनी जनतेच्या जनादेशाचा विश्वासघात केला असून हे केवळ आपल्या संविधानाचा आणि लोकशाहीचाच नव्हे, तर नागरिकांच्या इच्छेचाही अनादर करणारे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com