गोवा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 53 अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य सरकारने 16 नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश केला जारी
Goa Transfers of 53 officers on backdrop of Goa elections
Goa Transfers of 53 officers on backdrop of Goa elections Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: Goa राज्य सरकारने 16 नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा (Transfers) आदेश जारी केला आहे. योगीराज गोसावी यांची फोंडा पालिका मुख्याधिकारीपदी तर सीताराम सावळ यांची म्हापसा मुख्याधिकारीपदी बदली केली आहे. याव्यतिरिक्त तालुक्यातील 37 मामलेदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आगामी निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर या बदल्या काढण्यात आल्या आहेत. अनेक अधिकाऱ्यांना पदाचा भार देण्यात आला नव्हता, त्यांना तो देण्यात आला आहे.

Goa Transfers of 53 officers on backdrop of Goa elections
..आता कोकण रेल्वेसेवेत होणार वाढ

शुभम नाईक यांची उत्तर गोवा उपजिल्हाधिकारी (निवडणूक), गणेश बर्वे यांची काणकोण मुख्याधिकारीपदी, आश्‍विनी गावस देसाई यांची उद्योग, व्यापार व वाणिज्य उपसंचालकपदी, गिरीश सावंत : अवर सचिव (गृह), मनोहर कारेकर : कुडचडे मुख्याधिकारी, सागर गावडे : उत्तर विभाग कोमुनिदाद प्रशासक, उल्हास कदम : तिळारी जलसंपदा प्रकल्प भूसंपादन अधिकारी, नॅन्सी फर्नांडिस : अवर सचिव (सर्वसाधारण प्रशासन -२), सीमा साळकर ऊर्फ विरा नायक : आदिवासी कल्याण खाते उपसंचालक,

Goa Transfers of 53 officers on backdrop of Goa elections
'गोवा फॉरवर्डने' तृणमूलकडे का फिरवली पाठ?

स्वाती दळवी : आदिवासी कल्याण उपसंचालक व फोंडा राजीव गांधी कला मंदिर सदस्य सचिव म्‍हणून अतिरिक्त ताबा, राजू आर. देसाई : दक्षिण गोवा पंचायत उपसंचालक, दीपेश प्रियोळकर : कृषीमंत्र्यांच्या कार्यालयात अवर सचिव, प्रसाद वळवईकर : सालसेत उपजिल्हाधिकारीपदी व श्रीपाद आर्लेकर : अवर सचिव (सर्वसाधारण प्रशासन -1) व मुख्यमंत्र्यांचे अवर सचिव (अतिरिक्त ताबा).

याव्यतिरिक्त सध्या पदावर असलेल्या मिलाग्रीस सुआरिस यांच्याकडे वाहतूक उपसंचालक (प्रशासन) अतिरिक्त ताबा, विवेक नाईक यांच्याकडे पालिक प्रशासन उपसंचालक अतिरिक्त ताबा, पी. ए. परब यांच्याकडे पर्यटन उपसंचालक अतिरिक्त ताबा, पांडुरंग तळेगावकर यांच्याकडे पर्यटन भूसंपादन अधिकारी अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com