IRONMAN 70.3: गोव्यात होण्याऱ्या आयर्नमॅन 70.3 च्या कार्यक्रमासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून त्यासंदर्भातची माहिती देणारा चार्ट जारी करण्यात आला आहे. या इव्हेंटच्यावेळी मांडवी नदी व मिरामार समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने असलेला रस्ता दिवजा सर्कल ते दोनापावल सर्कलपर्यंत पहाटे 3 ते इव्हेंट संपेपर्यंत सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
8 ऑक्टोबरला आयर्नमॅन 70.3 इंडिया इव्हेंटवेळी पहाटे 3 ते संपेपर्यंत मिरामार सर्कल येथील समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने असलेला रस्ता मिरामार सर्कल ते हॉटेल विवांता मिरामार वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
नेहमीच्या प्रवासी बसेस इतर मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत. ज्या रस्त्यावर हा इव्हेंट होणार आहे तेथील परिसर नो पार्किंग व नो स्टॉपिंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
जुने गोवा-रायबंदर बाजूकडून पणजीकडे जाणारी वाहने रायबंदर पट्टो येथे चिंबेल जंक्शनच्या दिशेने वळवली जातील आणि मर्सेस जंक्शन/अटल सेतू-पणजी डाउन रॅम्प मार्गे पणजीकडे जातील.
त्याचप्रमाणे पणजी शहरातून रायबंदरकडे जाऊ इच्छिणाऱ्या वाहनांची वाहतूक केटीसी सर्कल-माला-स्टा क्रूझ- रायबंदरमार्गे पुढे जाण्यासाठी दिवजा सर्कल येथे वळवण्यात येईल.
डी. बी. मार्गावरील रहिवाशांसाठी मिरामार रेसिडेन्सी ते कांपाल येथील स्टारबक्स कॅफे येथपर्यंत रस्ता खुला असेल व त्यानंतर त्यांना आतील रस्त्याने पुढे जावे लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.