Goa Traffic: हेल्मेट, सीटबेल्ट नसल्यास वाहनधारकांना AI पाठवणार दंडाचे चलन

नवीन सॉफ्टवेयर ओळखणार अवैध इन्शुरन्स
Goa Traffic AI System
Goa Traffic AI System Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Traffic Violations: गोव्यात वाहतूक नियंत्रणसाठी स्मार्ट पद्धत वापरली जात आहे. वाहतूक संचलनालय आणि इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड (IPSCDL) यांनी यात आता आणखी सुधारणा करण्याची आणि त्याची व्याप्ती वाढविण्याचे ठरवले आहे.

इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमद्वारे (ITMS) सिग्नल मोडणाऱ्या वाहनधारकांना किंवा अधिक वेगाने गाडी चालवणाऱ्यांना या सिस्टिमद्वारे थेट दंडाचे चलन पाठवले जात होते. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो.

दरम्यान, या यंत्रणेत आता इतरही वाहतूक नियमांच्या उल्लंघनांचा समावेश होणार आहे.

Goa Traffic AI System
Goa Monsoon Update: ऑक्टोबरमध्ये आत्तापर्यंत 57 टक्के जास्त पाऊस; मॉन्सून पॅटर्न बदलतोय...

यात आता हेलमेटशिवाय प्रवास करणे, दुचाकीवरून ट्रिपल सिट प्रवास करणे, कारमधून प्रवास करताना सीट बेल्ट न वापरणे, वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणे, कारला टिंटेड ग्लास (काच) वापरलेली असेल

आणि गाडीच्या नंबरप्लेटवरील नंबर वाचता येण्यासारखा नसेल तर देखील आता एआयद्वारे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स - कृत्रिम बुद्धिमत्ता) दंडाचे चलन अशा वाहनधारकांना पाठवले जाणार आहे.

याशिवाय महत्वाचे म्हणजे, काऊंटडाऊन डिजिटल टायमर्स आता सिग्नलवर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाची माहिती मिळू शकेल.

नवीन सॉफ्टवेयरद्वारे गाडीच्या अवैध इन्शुरन्सची माहितीही कळू शकणार आहे. तसेच गाडीचे फिटनेस सर्टिफिकेट वैध आहे की नाही याची तपासणीही या सॉफ्टवेयरद्वारे करता येणार आहे.

गेल्या चार महिन्यांपासून ITMS द्वारे वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनधारकांना दंडाचे चलन पाठवले जात आहे. तथापि, गेल्या या चार महिन्यात ITMS द्वारे पाठविण्यात येणाऱ्या दंडाच्या चलनात घट झालेली आहे.

Goa Traffic AI System
Goa PWD: गोव्यात अद्यापही 80 ते 100 एमएलडी शुद्ध पाण्याची कमतरता; पुढील वर्षात राज्य होणार स्वयंपूर्ण

कारण, एकदा या सिस्टिममधून वाहनधारकांना अशा पद्धतीचे चलन पाठवले गेले की पुढच्या वेळेस वाहनधारक अधिक खबरदारी घेताना दिसतात.

कारण वारंवार वाहतूक नियमभंग करताना आढळून आल्यास वाहतूक परवाना निलंबनाची कारवाई होऊ शकते, याची जाणही वाहनधारकांमध्ये असल्याने या सिस्टिमचा लाभ वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे पालन करण्यामध्ये होत आहे.

अशा पद्धतीचा इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स हा एकप्रकारे तिसऱ्या डोळ्याप्रमाणे काम करत आहे. आणि विशेष म्हणजे, पुराव्यावर आधारीत ही सिस्टिम आहे आणि यात पारदर्शकता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com