

पणजी: बनावट ई-चलन संकेतस्थळ आणि पडताळणी न केलेल्या पेमेंट लिंक्सद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, ट्रॅफिक चलनची पडताळणी करावी आणि केवळ अधिकृत सरकारी पोर्टल्स किंवा ॲप्लिकेशन्सद्वारेच दंड भरावा, असे आवाहन वाहतूक संचालनालयाने नागरिकांना केले आहे.
वाहतूक संचालनालयाने नागरिकांना ई-चलन भरण्यासाठी echallan.parivahan.nic.in किंवा echallan.parivahan.gov.in या राष्ट्रीय पोर्टल्सवरून चलनाची पडताळणी करावी, असे सूचित केले आहे. त्याशिवाय वाहनधारकांच्या मदतीसाठी helpdesk-echallan@gov.in या ईमेलवर किंवा ०१२०-४९२५५०५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
गोवा राज्यासाठी वाहतूक खात्याने echallan.goatransport.gov.in आणि goa.goa.gov.in ही पोर्टल्स उपलब्ध आहेत. गोव्यातील ई-चलनशी संबंधित प्रश्नांसाठी support@goaechallan.com वर ईमेल करता येईल. दक्षिण गोव्यासाठी ६३६४१८४२८२ आणि ८१४७०८५७६३, तर उत्तर गोव्यासाठी ९९७२९०९७०२ आणि ९९७२९०९५८१ हे हेल्पलाइन क्रमांक दिले आहेत.
अधिकृत व्हॉट्सॲप ब्रॉडकास्ट अकाउंटचे नाव Goa e-Challan (क्रमांक: +९१ ९९०२६७३२५७) असे असून एसएमएस पाठवणाऱ्याचे आयडी ‘GOATRF’ असे आहे. याव्यतिरिक्त goa.goa.gov.in पोर्टलसाठी १६०००१३०३९ आणि १८००३०९९०२० हे हेल्पलाइन क्रमांकही उपलब्ध आहेत, असे कळविण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.