Goa News : अष्टमीच्या फेरीसाठी नव्याने अर्ज विक्री

सुरवातीचे अर्ज बाद; पूर्वीचे पैसे परत
New application sale for Ashtami Ferry
New application sale for Ashtami FerryDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : अष्टमीच्या फेरीसाठी विक्रेत्यांना अर्ज विक्रीचा काळाबाजार झाल्याने महापालिकेची नाहक बदनामी झाली. त्यामुळे महापालिकेने उद्या शनिवारी नव्याने अर्ज विक्री करण्यास सुरवात करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सायंकाळी 75 विक्रेत्यांना टोकन दिले असून, नव्याने येणाऱ्यांना सायंकाळपर्यंत रांगेत उभे राहून अर्ज घ्यावे लागतील.

New application sale for Ashtami Ferry
Land Grabbing Case : तपासाची सुई राजकीय नेत्यांकडे

मांडवी तिरावर भरल्या जाणाऱ्या फेरीत आता 430 वरून 400 वर दुकानांना परवानगी दिल्याची माहिती आयुक्त आग्नेलो फर्नांडिस यांनी दिली. अर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया नव्याने सुरू केली आहे. यापूर्वी ज्यांच्याकडून अर्जांसाठी पैसे स्वीकारले आहेत, त्यांना ते परत केले जातील. तीन दिवसांमुळे महापालिकेला भाड्यापोटी मिळणाऱ्या रकमेचे नुकसान सोसावे लागणार आहे.

मोन्सेरात यांची मध्यस्थी

यापूर्वी कधीही असा फेरीच्या अर्जांचा घोळ झाला नाही. या प्रकरणात नगरसेवकांनी आणि त्यांच्या आप्तेष्टांनी जो काही घोळ घातला, त्यावरून मनपासह सत्ताधारी गटाचे सर्वेसर्वा असणाऱ्या आमदार बाबूश मोन्सेरात यांच्याकडे बोट दाखविले जात होते. अखेर त्यांनीच यावर उपाय काढल्याची चर्चा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com