GTDC चे रविवारी वजीर धबधब्यावर ट्रेकिंग; कसा असणार प्रवास आणि फी जाणून घ्या
Ozari WaterfallDainik Gomantak

Ozari Waterfall Trek: GTDC चे रविवारी वजीर धबधब्यावर ट्रेकिंग; कसा असणार प्रवास आणि फी जाणून घ्या

Ozari Waterfall Trek:इच्छुक ट्रेकर्सना अतिरिक्त कपडे, रेनवेअर, ट्रेकिंग शूज, स्नॅक्स सोबत घेऊन जाण्याची विनंती करण्यात आली आहे.
Published on

पर्यटन विकास महामंडळाची तिसरी मॉन्सून ट्रेकिंग मोहीम रविवार ७ जुलै रोजी वजीर धबधब्यावर होणार आहे. हा एक अप्रचलित धबधबा असून निसर्गप्रेमी व ट्रेकर्सना ट्रेकिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे, असे मंडळाचे अधिकारी अनिल दलाल यांनी सांगितले.

गावापासून धबधब्यापर्यंतची वाट वेगळा अनुभव देणारी असेल. शेतजमीन तसेच घनदाट जंगलातून निसर्ग न्याहाळत जाताना सहभागींना वेगळा अनुभव मिळेल. वजीर हा छोटा धबधबा असून ट्रेकर्ससाठी सुरक्षित ठिकाण आहे.

या ट्रेकिंग दरम्यान स्वादिष्ट व्हेज आणि नॉनव्हेज जेवण सहभागींना दिले जाईल. प्रत्येकी शुल्क रु. १२०० असून यात दुपारचे जेवण, वाहतूक आणि मार्गदर्शक यांचा समावेश आहे, असे दलाल यांनी सांगितले.

GTDC चे रविवारी वजीर धबधब्यावर ट्रेकिंग; कसा असणार प्रवास आणि फी जाणून घ्या
Goa Dam Water Level: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?

म्हापसा रेसिडेन्सी येथून सकाळी ६.३० वाजता आणि मडगाव रेसिडेन्सी येथून सकाळी ७.३० वाजता बस ट्रेकिंगसाठी सुटेल. फोंडा भागातून प्रवास करणाऱ्यांनी थेट मडगाव गाठावे. वेर्णा, कुठ्ठाळी, नुवे, कुंकळ्ळी, बाळ्ळी येथेही बस थांबेल.

इच्छुक ट्रेकर्सना अतिरिक्त कपडे, रेनवेअर, ट्रेकिंग शूज, स्नॅक्स सोबत घेऊन जाण्याची विनंती करण्यात आली आहे. धूम्रपान आणि मद्यपान करण्यास इथे मनाई असेल. याशिवाय जवळच्या परिसरात प्लास्टिकच्या रॅपरसह इतर कचरा टाकण्यास बंदी असेल, असे दलाल यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com