Goa Tourism 2023: अशी असते गोव्यातली 31st नाईट....! तुम्हीही आवर्जून करा 'या' गोष्टी

Goa Tourism: गोव्यातील 31 डिसेंबर म्हणजेच नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला विविध कार्यक्रम होत असतात. तसेच सामान्यतः संपूर्ण प्रदेशात असंख्य उत्सव आणि पार्ट्या होत असतात.
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

Goa Tourism: गोव्यातील 31 डिसेंबर म्हणजेच नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला विविध कार्यक्रम होत असतात. तसेच सामान्यतः संपूर्ण प्रदेशात असंख्य उत्सव आणि पार्ट्या होत असतात. नवीन वर्षाची संध्याकाळ हा जागतिक स्तरावर एक उत्सवाचा प्रसंग आहे. गोवा हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ असल्याने नवीन वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

Goa Tourism
MP Francis Sardin: मला पाचव्‍यांदा लोकसभेत पाठवा

बीच पार्टी:

गोव्यातील अनेक किनारे, जसे की बागा बीच, अंजुना बीच आणि कलंगुट बीच, याठीकाणी संगीत, नृत्यासोबत खास पार्टी असते.

नाइटक्लब आणि रिसॉर्ट्स:

गोव्यातील असंख्य नाइटक्लब आणि रिसॉर्ट्स नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लाइव्ह म्युझिक परफॉर्मन्स, डीजेचे खास कार्यक्रम आयोजित करतात.

नदीकिनारी पार्टी:

नदीकाठच्या काही ठिकाणी, जसे की पणजी किंवा मांडोवी नदीकाठी, विशेष कार्यक्रम किंवा फटाक्यांची आतिशबाजी असते.

Goa Tourism
Goa Weather Update: नवीन वर्षात गोव्यात फिरायला येण्याचा प्लॅन करत असाल, तर आधी जाणून घ्या हवामानाचा अंदाज

क्रूझ पार्टी:

संगीत, नृत्य आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी मांडोवी नदीवरील क्रूझमध्ये नक्की जा. याठीकाणी क्रूझ पार्टी असते

बीच शॅक्स आणि रेस्टॉरंट्स:

अनेक बीचफ्रंट शॅक्स आणि रेस्टॉरंट्स नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला खास डिनर आणि पार्टी आयोजित करतात.

स्ट्रीट पार्टी:

गोव्यात स्ट्रीट पार्टी हे खुप सामान्य आहे. पण सार्वजनिक उत्सवांमध्ये सहभागी होताना स्थानिक नियम आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांची जाणीव ठेवा.

गोव्यातील 31 डिसेंबरच्या इव्हेंटसाठी सर्वात अचूक आणि वर्तमान माहिती मिळविण्यासाठी, गोव्यातील स्थानिक कार्यक्रम आयोजक, पर्यटन मंडळे किंवा ऑनलाइन इव्हेंट प्लॅटफॉर्मवर चेक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com