Goa Tourism: देशी, विदेशी पर्यटक वाढले! चार्टर विमानांच्या लँडिंगमध्ये वाढ; पर्यटन खात्‍याचा दावा

Tourist In Goa: यंदाच्या पर्यटन हंगामात डिसेंबर २०२५ पर्यंत राज्‍यात १,०२,८४,६०८ देशी आणि ५,१७,८०२ विदेशी अशा मिळून १,०८,०२,४१० इतक्‍या पर्यटकांची नोंद झालेली आहे.
Goa Beach | Goa Tourism
Goa Beach | Goa Tourism Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: यंदाच्या पर्यटन हंगामात डिसेंबर २०२५ पर्यंत राज्‍यात १,०२,८४,६०८ देशी आणि ५,१७,८०२ विदेशी अशा मिळून १,०८,०२,४१० इतक्‍या पर्यटकांची नोंद झालेली आहे. २०१७ पासून सातत्‍याने पर्यटकांच्‍या संख्‍येत वाढ होत असल्‍याचा दावा पर्यटन खात्‍याने केला आहे.

२०१७ मध्ये राज्‍याला ६८,९५,२३४ देशी आणि ८,९०,४५९ विदेशी अशा मिळून एकूण ७७,८५,६९३ पर्यटकांनी भेट दिली होती. २०१८ व २०१९ मध्ये ही संख्या अनुक्रमे ८०,१५,४०० आणि ८०,६४,४०० इतकी झाली. त्‍यानंतर २०२३ आणि २०२४ मध्ये त्‍यात पुन्हा वाढ झाली.

Goa Beach | Goa Tourism
Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

पर्यटन खात्‍याच्‍या प्रयत्‍नांना यश

पर्यटन हंगामात राज्‍यात येणाऱ्या देशी, विदेशी पर्यटकांमध्‍ये प्रत्‍येक वर्षी वाढ होत आहे. यातून अधिकाधिक पर्यटक राज्‍यात आणण्‍यासाठी पर्यटन खाते घेत असलेल्‍या प्रयत्‍नांना यश मिळत असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले.

चार्टर विमानांचे लँडिंग वाढले

चार्टर विमानांद्वारे राज्‍यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांतही वाढ झाली आहे. २०१७ मध्ये १,०२४ चार्टर विमानांद्वारे २,४९,३७४ विदेशी पर्यटक राज्‍यात आले होते. २०१९ मध्ये कोविडमुळे ही संख्या घटली. यावर्षी ७९९ चार्टर विमानांद्वारे २,१६,७३८ पर्यटक राज्‍यात आले होते.

Goa Beach | Goa Tourism
Konkan Tourism: फॅमिली ट्रिपसाठी 'परफेक्ट' लोकेशन! सुरक्षितता आणि सौंदर्याचा संगम असलेला शिरोडा बीच

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर २०२३ मध्ये दोन्ही विमानतळांवर आलेल्‍या ३५६ चार्टर विमानांद्वारे ७२,७९५ पर्यटक राज्‍यात आले. २०२४ मध्ये २६६ चार्टर विमानांद्वारे ५८,६८०, तर २०२५ मध्ये १८९ चार्टर विमानांद्वारे ४०,३३६ विदेशी पर्यटक गोव्यात दाखल झाल्‍याचेही पर्यटन खात्‍याने जारी केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com