Goa Politics: खंवटे - लोबोंमधील दरी कायम; पर्वरीत एका व्यासपीठावर येणे टाळले

शॅक वाटप प्रकरणावरून दोन्ही नेत्यांचे पटत नसल्याचे जाहीरपणे दिसून आले होते.
Rohan Khaunte VS Michael Lobo
Rohan Khaunte VS Michael LoboDainik Gomantak

Goa New Beach Shack Policy: पर्वरी येथील विद्याप्रबोधिनी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या लोकप्रतिनिधींच्या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पर्यटनमंत्री रोहन खंवटे व आमदार मायकल लोबो हे एकत्र येणार असे वाटत असतानाच शनिवारी खंवटे त्याला अनुपस्थित राहिल्याने पुन्हा त्यांच्यातील दुराव्याची चर्चा सुरु झाली आहे.

शॅक वाटप प्रकरणावरून या दोन्ही नेत्यांचे पटत नसल्याचे जाहीरपणे दिसून आले होते. शॅक वाटप कधी होणार याची व्यावसायिकांना प्रतीक्षा होती.

Rohan Khaunte VS Michael Lobo
पैसे कमावण्यासाठी 'प्लान बी' तयार हवा; एका रिलवर 1 million views असलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स 'मिथील'ने दिल्या टिप्स

त्यातच पर्यटन खात्याने नवे शॅक धोरण मंत्रिमंडळात मंजूर करवून घेतले होते. मात्र, ते धोरण अधिसूचित केले नव्हते.

त्यातील काही तरतुदींना शॅक व्यावसायिकांचा विरोध होता. लोबो यांची मदत त्या व्यावसायिकांनी घेतली. लोबो यांनी पर्यटनमंत्री खंवटे यांच्याऐवजी थेटपणे मुख्यमंत्र्यांकडे हा विषय नेला.

मुख्यमंत्र्यांनीही त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. हे खंवटे यांना समजल्यावर शॅक व्यावसायिकांना कोणीतरी भडकवत आहे असा आरोप जाहीरपणे त्यांनी केला होता.

त्याआधी कळंगुट परिसरातच पर्यटन संदर्भातील गैरप्रकार का घडतात, अशा प्रवृत्तींना कोणाचा आशीर्वाद आहे असा बोलका प्रश्न खंवटे यांनी उपस्थित केला होता. पर्यटन खाते व पोलिस खात्याने त्यानंतर कळंगुट परिसरात कारवाईही केली होती.

विधानसभा निवडणूक काळात लोबो यांनी पर्वरी मतदारसंघापर्यंत आपला प्रभाव पोचवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी लोबो कॉंग्रेसमध्ये, तर खंवटे भाजपमध्ये होते. निवडणुकीनंतर लोबो भाजपमध्ये आले तरी त्या दोन्ही नेत्यांचे मनोमीलन झाले नसल्याचे जाणवते.

शॅक धोरण प्रकरणी खंवटे यांनी ताठर भूमिका घेतली. शॅक भाड्याने दिल्यास दंडाची रक्कम कमी करण्यास सरळ नकार दिला. अखेर ४ वर्षांपेक्षा अनुभवी व्यावसायिकांना ८० टक्के, ४ वर्षांपर्यंत अनुभव असलेल्यांना १० टक्के, तर अननुभवींना १० टक्के परवाने आरक्षित ठेवण्याचे मान्य करून नव्या शॅक धोरणावर मतैक्य करण्यात आले.

त्याआधी लोबो यांनी हे नवे शॅक धोरण काय आहे हे सांगितलेच जात नसल्याचे जाहीरपणे म्हटले होते. आता शॅक परवाने दिले जाणार आहेत. त्यामुळे हा वाद निवळेल की काय अशी चर्चा होती.

त्यातच पर्वरीच्या विद्याप्रबोधिनी महविद्यालयाने बार्देशमधील लोकप्रतिनिधींसाठी आयोजित स्नेहमेळाव्यास लोबो व खंवटे एकत्र येतील असे वाटत होते. मात्र, खंवटे हे त्यात सहभागी न झाल्याने त्यांच्यातील दरी कमी न झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

लोबोंनीच साधला संवाद

लोबो यांचे समर्थक मानले जाणारे साळगावचे आमदार केदार नाईक तसेच हळदोण्याचे आमदार ॲड. कार्लोस फेरेरा हेही या स्नेहमेळाव्यापासून दूर राहिल्याने तालुकाभरातील पंच, सरपंचांशी संवाद साधण्याची संधी एकट्या लोबो यांना मिळाली.

त्यांनी सरकारच्या योजना लोकांपर्यंत नेण्याचे आवाहन करत सरकारची भूमिका पुढे नेण्याचा प्रयत्न केला.

Rohan Khaunte VS Michael Lobo
Football World Cup: भारतीयांना फुटबॉल मधल काय कळतं! गोव्याच्या नेतृत्वाखाली वकीलांनी स्पेनमध्ये जिंकला वर्ल्डकप

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com