Goa Tourism Development Corporation: राज्यातील अनियमित व उशिरा आलेल्या पावसामुळे या पावसाळ्यात गोव्याच्या मध्यवर्ती भागात मान्सून ट्रेकिंगची संख्या कमी होती. जूनपासून गोवा पर्यटन विकास महामंडळ(जीटीडीसी)ने राज्यात केवळ पाच पावसाळी ट्रेकिंगचे आयोजन केले आहे.
गोवा पर्यटन विकास महामंडळ आणि गोव्याचा पर्यटन विभाग पावसाळ्यात विविध पर्यटन उपक्रमांचे आयोजन करून गोव्यातील रेनड्रॉप टुरिझम संकल्पनेला चालना देण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.
पण खेदाची गोष्ट म्हणजे, या वर्षी मान्सून जूनमध्ये खूप उशिरा दाखल झाला ज्यामुळे गोव्याच्या दुर्गम भागात मान्सून ट्रेकिंगच्या नियोजनावर परिणाम झाला.
‘गोमन्तक’शी बोलताना ‘जीटीडीसी’चे अधिकारी अनिल दलाल यांनी सांगितले की, जूनपासून केवळ पाचच मान्सून ट्रेक आयोजले आहेत.
"गोव्यातील वन्यजीव अभयारण्यांना भेट देण्यावर राज्य सरकारने अलिकडेच घातलेल्या बंदीमुळे, जीटीडीसी गोव्याच्या दुर्गम भागात ट्रेकिंगचे कोणतेही उपक्रम करू शकत नाही. कारण पर्यटक खास येथे येतात, धबधबे पहायला. लवकरच आम्ही आणखी अनेक ट्रेकिंग उपक्रम आयोजित करू."
अनिल दलाल, जीटीडीसी-अधिकारी
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.