Goa Tourism Department:
Goa Tourism Department: Dainik Gomantak

Goa Tourism Department: गोवा पर्यटन विभागाने पटकावला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट अवॉर्ड'

Goa Tourism Department: ओटीएम मुंबई 2024 मध्ये पुनर्संचयित पर्यटनासाठी ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट अवॉर्ड’ अर्थात सर्वोत्तम नावीन्यपूर्ण उत्पादन पुरस्कार गोवा पर्यटन विभागाने पटकावला.
Published on

Goa Tourism Department: ओटीएम मुंबई २०२४ मध्ये पुनर्संचयित पर्यटनासाठी ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट अवॉर्ड’ अर्थात सर्वोत्तम नावीन्यपूर्ण उत्पादन पुरस्कार गोवा पर्यटन विभागाने पटकावला. राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री दिया कुमारी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जबाबदार आणि शाश्वत पद्धतींवर लक्ष केंद्रित करणाऱ्या पुनर्संचयित पर्यटनाला चालना देण्याच्या गोव्याच्या प्रमुख भूमिकेवर शिक्कामोर्तब करणारा हा पुरस्कार आहे.

गोव्याचा ‘एकादश तीर्थ’ उपक्रम अध्यात्म, स्थानिक संस्कृती, राष्ट्रवाद आणि जागरूक पर्यटन एकत्र आणतो. वारसा जतन करणे, उत्साही सणांचे आयोजन करणे, साहसी उपक्रम राबवणे, संमेलने आणि

Goa Tourism Department:
Goa Latest News: वेलिंगकरांनी धार्मिक द्वेष भावना पसरवू नये; चर्चिल आलेमाव

कार्यक्रमांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी गोव्याचे प्रयत्न अधोरेखित झाले. यावरून गोव्याच्या शाश्‍‍वततेची बांधिलकी दिसून येते.

दरम्‍यान, गोव्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी ही एक महत्त्‍वपूर्ण उपलब्‍धी आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ व्यवस्थापक विशेष नाईक यांनी हा पुरस्कार स्‍वीकारला. उपसंचालिका मनीषा कळसकर, साहाय्यक पर्यटन अधिकारी चित्रा वेंगुर्लेकर आणि मान्‍यवरांची उपस्‍थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com