Goa tourism: 'एटीएम दुबई 2025'मध्ये गोव्याचा सहभाग, शाश्वत पर्यटनावर देणार विशेष भर

ATM 2025 Participation Goa: दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित होणाऱ्या अरेबियन ट्रॅव्हल मार्केट (एटीएम) २०२५ मध्ये सहभागी होणार असून यामध्ये गोव्यातील शाश्वत पर्यटनावर भर देण्यात येईल.
Goa tourism
Goa tourismDainik Gomantak
Published on
Updated on

‘वर्षभर उपयुक्त पर्यटन स्थळ’पणजी: गोवा पर्यटन विभाग २८ एप्रिल ते १ मे २०२५ दरम्यान दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित होणाऱ्या अरेबियन ट्रॅव्हल मार्केट (एटीएम) २०२५ मध्ये सहभागी होणार असून यामध्ये गोव्यातील शाश्वत पर्यटनावर भर देण्यात येईल, अशी माहिती विभागातर्फे देण्यात आली आहे.

या प्रवासी बाजारपेठेत गोव्याची उपस्थिती बळकट करण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण व अनुभवात्मक पर्यटन पसंत करणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने ही महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत.

या प्रदर्शनात गोवा पर्यटनाचे विशेष दालन उभारण्यात येणार असून, पारंपरिक सन, सॅण्ड अँड सी पलीकडे जाऊन गोव्याच्या समृद्ध संस्कृती, वारसा, अध्यात्मिक पर्यटन, हरित उपक्रम आणि स्थानिक अनुभवांवर भर दिला जाणार आहे.

Goa tourism
Goa Crime: दारूच्या नशेत उडाले खटके; रायमध्ये ओडिसाच्या कामगाराची डोक्यात वार करून हत्या

विशेषतः वेलनेस, एमआयसीई, अध्यात्मिक व सांस्कृतिक पर्यटन यांसारख्या विविध प्रवास क्षेत्रांना चालना देण्यावर भर राहील.

या दालनात शाश्वत आणि समाजाभिमुख पर्यटनाच्या दिशेने उचलण्यात येणाऱ्या नव्या पावलांचीही ओळख करून दिली जाईल.

अरेबियन ट्रॅव्हल मार्केट हे जागतिक पर्यटन उद्योगाशी थेट संपर्क साधण्याचे प्रभावी व्यासपीठ आहे. गोव्याच्या बहुआयामी पर्यटन सेवांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचार करण्यासाठी ही संधी आम्हाला अधिक दृढ संकल्पित करते. ‘एटीएम २०२५’ मधील सहभागामुळे गोव्याचे स्थान भारतातील एक अग्रगण्य, नावीन्यपूर्ण आणि शाश्वत पर्यटनस्थळ म्हणून अधिक बळकट होईल. - केदार नाईक, पर्यटन संचालक

Goa tourism
Goa Rural Sanitation: ग्रामीण स्वच्छतेत 'गोवा' देशात आघाडीवर, राज्यातील तब्बल 98.66% गावांना 'ओडीएफ प्लस' दर्जा

‘वर्षभर उपयुक्त पर्यटन स्थळ’

गोवा पर्यटन विभागाचे शिष्टमंडळ या व्यासपीठावर नवीन उपक्रम, पायाभूत सुविधांमधील सुधारणा, आगामी महोत्सव आणि विविध कार्यक्रम सादर करणार आहे. देश-विदेशातील पर्यटकांसाठी गोव्याला ‘वर्षभर उपयुक्त पर्यटन स्थळ’ म्हणून सादर करण्याचा विभागाचा प्रयत्न आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com