Goa Tourism Department: दिल्लीत अतुल्य भारत प्रदर्शनात ‘गोवा पर्यटन’चा स्टॉल; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‍घाटन

Incredible India Exhibition: या कार्यक्रमाचा उद्देश समुद्रकिनाऱ्यांच्या पलीकडे असलेल्या अद्वितीय सौंदर्याचे प्रदर्शन करण्यासाठी गोवा पर्यटनाची बांधिलकी देखील अधोरेखित करते
Incredible India Exhibition: या कार्यक्रमाचा उद्देश समुद्रकिनाऱ्यांच्या पलीकडे असलेल्या अद्वितीय सौंदर्याचे प्रदर्शन करण्यासाठी गोवा पर्यटनाची बांधिलकी देखील अधोरेखित करते
Goa Tourism DepartmentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा पर्यटन विभाग २१ ते ३१ जुलै दरम्यान होणाऱ्या ‘अतुल्य भारत प्रदर्शन’ मध्ये सहभागी झाला आहे. हे प्रदर्शन भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटर, नवी दिल्ली येथे सुरू आहे. भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि विविध पर्यटन संधींवर प्रकाश टाकणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. जागतिक वारसा समितीच्या ४६ व्या सत्रांतर्गत आयोजित या प्रदर्शनाचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘युनेस्को’चे महासंचालक ऑड्रे अझौले यांच्या उपस्थितीत झाले. गोवा पर्यटन विभागाचे प्रतिनिधीत्व गोवा पर्यटन विकास महामंडळाचे विपणन व्यवस्थापक अक्षय गोवेकर करत आहेत.

हॉल क्र.१४ मध्ये उभारलेले, गोवा पॅव्हेलियन, राज्याचा समृद्ध इतिहास, संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्य व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ प्रदान करते. स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांनी बनवलेल्या नारळाच्या शिंपल्यांसह गोव्यातील पारंपारिक हस्तकला आणि कलाकृती प्रदर्शित केल्या आहेत.

‘हिंटरलॅन्ड टुरिझम’वर भर देण्याचे, तसेच राज्याच्या स्थानिक संस्कृती आणि वारशाची ओळख करून देण्याचे ‘गोवा पर्यटन’चे उद्दिष्ट साधण्याची तसेच हा मंच नेटवर्किंगसाठी उत्कृष्ट संधी आहे. याव्यतिरिक्त, गोवा पर्यटन विभागाला आशा आहे की, या प्रदर्शनात सादर केलेल्या प्रदर्शनाचा आणि संधींचा स्थानिक कला, हस्तकला आणि व्यवसायांना फायदा होईल.

Incredible India Exhibition: या कार्यक्रमाचा उद्देश समुद्रकिनाऱ्यांच्या पलीकडे असलेल्या अद्वितीय सौंदर्याचे प्रदर्शन करण्यासाठी गोवा पर्यटनाची बांधिलकी देखील अधोरेखित करते
Goa Tourism Department: पर्यटन खात्याचा महत्वाचा निर्णय! टुरिस्ट गाइडसाठी आता प्रमाणपत्र प्रशिक्षण अनिवार्य

‘पर्यटन’चा समृद्ध सांस्कृतिक वारशावर भर

राज्याच्या नयनरम्य आणि समृद्ध संस्कृतीसह गोव्यातील समुद्रकिनारे, वारसा स्थळे, साहसी उपक्रम आणि पर्यटनाचे अभ्यागतांना मोहित करणारे दृश्य एलईडी स्क्रीन्सवर दाखवले जातील. या कार्यक्रमाचा उद्देश केवळ पर्यटनाला चालना देणे इतकाच नसून समुद्रकिनाऱ्यांच्या पलीकडे असलेल्या राज्याच्या अद्वितीय सौंदर्याचे प्रदर्शन करण्यासाठी गोवा पर्यटनाची बांधिलकी देखील अधोरेखित करते. अंतर्देशीय पर्यटन आणि राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशावर भर देऊन, हे प्रदर्शन गोव्याच्या कमी ज्ञात पैलूंची अभ्यागतांना ओळख करून देईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com