Goa Tourist: हुर्रे! 6 महिन्यांत 5.45 लाख पर्यटक; नव्या फ्लाईट्स, क्रूझमुळे फुलले पर्यटन

Goa Tourism Growth: राज्यात यावर्षी पहिल्याच सहा महिन्यांत तब्बल ५.४५ लाखांहून अधिक पर्यटकांचे आगमन झाले असून यामध्ये ५.१८ लाख देशांतर्गत आणि २७ हजार परदेशी प्रवाशांचा समावेश होता.
Goa tourist arrivals 2025
Goa international tourism growthDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात यावर्षी पहिल्याच सहा महिन्यांत तब्बल ५.४५ लाखांहून अधिक पर्यटकांचे आगमन झाले असून यामध्ये ५.१८ लाख देशांतर्गत आणि २७ हजार परदेशी प्रवाशांचा समावेश होता. ही आकडेवारी मागील वर्षाच्या तुलनेत ८.४ टक्क्यांनी अधिक असल्याचे पर्यटन खात्याने जाहीर केले असून वाढत्या पर्यटक संख्येबरोबरच नव्या आंतरराष्ट्रीय थेट उड्डाणे, चार्टर फ्लाईट्स आणि क्रूझ आगमनामुळे गोवा आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक बळकटपणे उभा राहत आहे.

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दाबोळी विमानतळ या दुहेरी सुविधा उपलब्ध असल्याने गोवा आजवरपेक्षा अधिक सक्षमपणे आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे स्वागत करीत आहे. पोलंड, उझबेकिस्तान, कझाकस्तान, रशिया, ब्रिटन आणि इराण येथून चार्टर फ्लाईट्स येत असून गल्फ देशांसह इराणमधून नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखील वाढली आहेत.

सप्टेंबरअखेरीस लंडन गॅटविकसाठी थेट विमानसेवा पुन्हा सुरू होत आहे. तसेच ५ ऑक्टोबरपासून रशियातील येकतेरिनबर्ग येथून मोपा विमानतळावर आठवड्यातून तीन उड्डाणे सुरू होणार आहेत.

प्रत्येक विमानात सुमारे २१० प्रवाशांची क्षमता असेल. हवाई मार्गाबरोबरच क्रूझ कनेक्टिव्हिटीही राज्यात विकसित करण्यात येत आहे.

पर्यटक संख्येत झालेल्या वाढीचा लाभ फक्त हॉटेल व्यवसायालाच नाही, तर स्थानिक कारागीर, लघुउद्योग आणि गावागावांतील होमस्टे व्यवसायालाही होत आहे. हस्तकला, सांस्कृतिक उपक्रम, ग्रामीण पर्यटन या सर्व क्षेत्रांत नवीन संधी निर्माण होत आहेत. पुनरुत्पादक पर्यटनाच्या तत्त्वांनुसार आर्थिक विकासासोबत पर्यावरण व समाजहित यावरही भर दिला जात आहे.

समाज, पर्यटन उद्योग समृद्ध :

आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढल्याने गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचा दर्जाही बदलला आहे. ते अधिक जागतिक आणि गोव्याच्या खऱ्या सौंदर्याचा शोध घेणारे आहेत. या प्रवृत्तीमुळे स्थानिक समाज आणि पर्यटन उद्योगदेखील समृद्ध होत आहेत, असे ट्रॅव्हल कॉर्पोरेशन इंडिया लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्नेस्ट डायस यांनी नमूद केले.

Goa tourist arrivals 2025
Tourism In Konkan: एक इंजीनिअर कोकणात का रमला? कोकणातल्या बदलत्या पर्यटनाकडे कसा पाहतो 'रानमाणूस'?

स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा

२०२४-२५ हंगामात विविध देशांतून आलेल्या चार्टर फ्लाईट्समुळे आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वार म्हणून गोव्याचे महत्त्व वाढले आहे. अधिक चांगली कनेक्टिव्हिटी तयार करण्याची सुवर्णसंधी राज्याला मिळाली आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील याचा थेट फायदा होत आहे, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

Goa tourist arrivals 2025
Goa Tourism: बाईक रेंट कमी, शॅक उभारणी! गोव्‍यासमोर महाराष्‍ट्र, कर्नाटकचे आव्‍हान; पर्यटनक्षेत्रात वाढली स्पर्धा

गोव्याचे बदलते पर्यटन चित्र

१ परदेशी पर्यटक आता फक्त समुद्रकिनाऱ्यांपुरते मर्यादित राहत नाहीत. वारसास्थळे, हेरिटेज वॉक, वेलनेस रिट्रीट्स, साहसी क्रीडा, तसेच खाद्यसंस्कृतीच्या प्रवासाकडे पर्यटकांचा कल अधिक वाढत आहे. संगीत महोत्सव, आंतरराष्ट्रीय परिषदा आणि सांस्कृतिक देवाणघेवाणींमुळे गोव्याची जागतिक प्रतिमादेखील आणखी दृढ होत आहे.

२चांगल्या हवाई व समुद्री कनेक्टिव्हिटीमुळे गोव्यात वर्षभर विविध देशांतील पर्यटकांचे स्वागत आम्ही केले असून येत्या हंगामात आणखी चार्टर आणि थेट जोडण्या वाढवण्याचे नियोजन सुरू आहे, असे पर्यटन संचालक केदार नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com