Human Trafficking : गोवा हे देशातील सर्वात लहान राज्य असूनही मानवी तस्करीत प्रथम स्थानी असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) आपल्या अहवालात दिली आहे. मानवी तस्करीचे प्रमाण राज्यातील एकूण लोकसंख्येच्या एक टक्का आहे, जे राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
2020 आणि 2021 मध्ये गोव्यात मानवी तस्करीची केवळ 32 प्रकरणे नोंदवली गेली होती. परंतु, एकही प्रकरणात संशयितांवर कोणतीही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही, असे एनसीआरबी अहवालात स्पष्ट केले आहे.
2021 मध्ये, गोव्यात मानवी तस्करीची 15 प्रकरणे नोंदवली गेली होती, त्यात 26 जणांना अटक आणि 35 पीडितांची सुटका करण्यात आली होती. 2020 मध्ये, 17 प्रकरणे नोंदवली गेली आणि 30 जणांना अटक करण्यात आली होती. 2020 आणि 2021 मध्ये, 5 प्रकरणे न्यायालयात सोडवली गेली आणि 5 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या काळात एकाही संशयिताला शिक्षा झालेली नाही. गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने हॉटेल्समध्ये विशेषतः किनारपट्टी भागात वेश्याव्यवसाय चालतो, असे अहवालात म्हटले आहे.
अन्याय रहित जिंदगीचे संचालक अरुण पांडे म्हणाले, मानवी तस्करी प्रकरणातील संशयितांना दोषी ठरवविण्यासाठी तपास प्रक्रियेत काही काही सुधारणा होणे अत्यावश्यक बनले आहे.
अनेकदा पीडितांचे पुनर्वसन केले जाते. 93 टक्के महिला स्थलांतरित आहेत आणि गोव्यात आल्यावर निवास आणि इतर खर्चाची काळजी घेतली जात नसल्याने त्या न्यायालयीन सुनावणीस उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे संशयितांना शिक्षा होत नाही. ज्यामुळे लैंगिक अत्याचार आणि मानवी तस्करीसाठी गोवा हे सुरक्षित ठिकाण आहे असा संदेश जातो, असे अन्याय रहित जिंदगीचे संचालक अरुण पांडे यांनी स्पष्ट केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.