Goa tops GI rankings
Goa tops GI rankingsDainik Gomantak

GI मानांकनात गोवा सरस

मयंडोळी केळी, गोवन खाजे, हरमल चिलीला मिळाले भौगोलिक मानांकन प्रमाणपत्र
Published on

पणजी:  केवळ त्या त्या भागात मिळणाऱ्या प्रदेशनिष्ठ घटकांना भौगोलिक मानांकन (GI अर्थात जिऑग्राफिकल इंडिकेशन Geographical indications) मिळते. राज्यात (Goa) यापूर्वी काजू फेणी (Kaju Feni) आणि खोला मिरचीला हे मानांकन मिळाले आहे. आता मयंडोळी केळी, गोवन खाजे, हरमल चिली यांना हे भौगोलिक मानांकन प्रमाणपत्र मिळाले आहे. आता मानकुराद आंबा, गोवन काजूगर, आगशी वांगी आणि बिबिंका यांच्या मानांकनासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती  विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण विभागाचे  जीआय समन्वयक अधिकारी दिलीप परब यांनी ‘गोमंतक’ला दिली.

Goa tops GI rankings
Goa Recruitment: ‘GHRDC’मध्ये रोजगाराच्या संधी!

पश्चिम किनारपट्टीवरील छोटेसे राज्य म्हणून प्रसिद्ध असणारे राज्य म्हणजे गोवा. इथल्या भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे सर्वत्र वेगळेपण आढळून येते. काही फळे, भाज्या, इतर घटक केवळ त्या त्या भागातच मिळतात. ते इतर कुठेच मिळत नाहीत. ही भौगोलिकता सांभाळून ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या भौगोलिक मानांकन विभागाच्या वतीने अशा घटकांना मानांकने दिली जातात. राज्यात प्रथमच 2009 साली काजू फेणीला हे मानांकन मिळाले. त्यानंतर 2917 साली खोला मिरचीला हे मानांकन मिळाले. आता मयंडोळी केळी, गोवन खाजे आणि हरमल चिलीला सप्टेंबर 2021 मध्ये हे मानांकन प्रमाणपत्र मिळाले आहे.

यासाठी गेली दोन वर्षे सतत प्रयत्न सुरू होते. आता गोव्याचे खास वैशिष्ट्य असणारा मानकुराद आंबा, चवीला रूचकर असलेली आगशीची वांगी, खास गोवन काजूगर आणि ख्रिश्चन समूहाबरोबर सर्वत्र प्रसिद्ध असणारा गोव्याचा खास गोडपदार्थ बिबिंका यासाठी मार्चपासून प्रयत्न सुरू झाले आहेत. या मानांकनासाठी अनेक प्रकारचे निकष आहेत. हे निकष पूर्ण करण्यासाठी काही दिवस लागतात. ते पूर्ण झाल्याशिवाय भौगोलिक मानांकन दिले जात नाही. नव्याने चार घटकांसाठी भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. ती मिळाल्यास राज्यात आणखी चार भौगोलिक मानांकने मिळतील. याचा उपयोग स्वामित्व, स्थानिक घटक आणि व्यावसायिक मूल्यवर्धनासाठी होऊ शकतो.

Goa tops GI rankings
Goa: नवी निवडणूक आयोग वेबसाईट लाँच
Mango
MangoDainik Gomantak

मानकुराद आंबा :  भौगोलिकदृष्ट्या केवळ गोव्यात मिळणारा मानकुराद आंबा अत्यंत गोड आणि चविष्ट आहे. आंब्यामधील गर आणि टिकून राहण्याच्या क्षमतेमुळे तो वैशिष्ट्यपूर्ण आहे.

Eggplant
EggplantDainik Gomantak

आगशी वांगी : ही वांगी नेहमीच्या वांग्यांपेक्षा मोठी असून वेगळ्या चवीसाठी प्रसिद्ध आहेत. आकार, उत्पादकता, प्रोटीन आणि जीवनसत्त्व यादृष्टीने ही वेगळी आहेत.

Cashews
CashewsDainik Gomantak

गोवन काजूगर  : गोव्यात काजू बाहेरील राज्यांतून किंवा परदेशातून येतात. गोवन काजूगरांना भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते मिळाल्यास काजूगराला मानाचे स्थान मिळेल.

बिबिंका : प्रामुख्याने ख्रिश्चन बांधवांकडे सर्रास पाहायला मिळणारा बिबिंका  हा आगळा-वेगळा गोड खाद्यपदार्थ असून तो  बनवण्याची प्रक्रिया वेगळी आणि दीर्घकाळ चालणारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com