पणजी: गोवा राज्य निवडणूक आयोगाने (Goa State Election Commission) राज्य निवडणूक आयुक्त डब्ल्यू व्ही. रमणमूर्ती, आयएएस (निवृत्त) यांच्या हस्ते निवडणूक आयोगाच्या पूर्णपणे सुधारित डायनामिक वेबसाईटचे (dynamic website) अनावरण केले. या सुधरित वेबसाईमध्ये सुव्यवस्थित आणि सरळ आराखडा, सुधारित कार्यक्षमता आणि समृद्ध सामग्री क्षेत्र यांचा अंतर्भाव आहे.
ज्यामुळे नागरिकांना, मतदारांना, उमेदवारांना, राजकीय पक्षांना, संशोधकांना, माध्यमांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाद्वारे घेण्यात येत असलेल्या निवडणूक प्रक्रियेसंबंधित माहिती सहजतेने उपलब्ध होणार आहे. राज्य निवडणूक आयोग, स्थानिक संस्था निवडणुकांसाठीचे कायदे आणि नियम, स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सांख्यिकीय डेटा, मागील आणि चालू निवडणुकांची अद्ययावत माहिती, आदेश आणि परिपत्रके, उमेदवारांसाठी मदत यांचे संकलन एकाच ठिकाणी एकत्रित केले आहे.
ही डायनामीक वेबसाईट लाँच केल्यावर त्याच्या ई-गव्हर्नन्स अॅप्लिकेशनसह आयोग निवडणूक संबंधित माहिती जलद, कार्यक्षमरित्या आणि तत्परतेने प्रसारित करेल. नवीन वेबसाईट वापरकर्त्यांना डेस्कटॉपवरून मोबाईल ब्राउझिंगमध्ये अखंड संक्रमण देखील मिळणार आहे. यावेळी गोवा राज्य निवडणूक आयोगाचे सचिव मेल्विन वाज, सहाय्यक सागर गुरव व गोवा राज्य निवडणूक आयोगाचे संचालकही उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.