Goa News: साळगावमध्ये दुहेरी हत्याकांडाचा संशय, दोन पुरूषांचे मृतदेह आढळले; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa News Live Blog Breakings In Marathi: गोव्यात दिवसभर विविध क्षेत्रात घडणाऱ्या ताज्य घडामोडी. गुन्हे, राजकारण, कला - क्रीडा -संस्कृती, अपघात इ.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

"पोलिस लवकरच दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करतील"

आमदार केदार नाईक यांनी आशा व्यक्त केली की पोलिस लवकरच त्यांच्या मतदारसंघात आज नोंदवलेल्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करतील.

भगवान बिरसा मुंडा 150 जयंती धुमधडाक्यात साजरी करणार

भगवान बिरसा मुंडा 150 जयंती धुमधडाक्यात साजरी करणार. शनिवारी (ता. 8) रोजी साखळी येथे संमेलन. कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांची माहिती. 15 रोजी मडगाव येथे होणार समारोप.

८ नोव्हेंबरपासून वास्कोतील श्री राम मंदिर येथे श्रीमद् भागवत कथा होणार सुरू

श्री धाम वृंदावन येथील डॉ. संजय कृष्ण सलील (एमडी) यांची आठवडाभर चालणारी श्रीमद् भागवत कथा ८ ते १४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत वास्को द गामा येथील वरुणपुरी येथील श्री राम मंदिर येथे होणार आहे. दररोजचे प्रवचन दुपारी ४ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत होतील.

साळगावमध्ये दुहेरी हत्याकांडाचा संशय; दोन पुरूषांचे मृतदेह आढळले

साळगावमध्ये दुहेरी हत्याकांडाचा संशय; दोन पुरूषांचे मृतदेह आढळले. सालिगाव पीआय आणि इतर पोलिस अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

अभिनेता गौरव बक्षी यांना समन्स

अभिनेता गौरव बक्षी यांना आज सकाळी ११.०० वाजता जुने गोवा पोलिस ठाण्याने समन्स बजावले आहे. काल त्यांच्याविरुद्ध शेजारच्या मालमत्तेतून मुंडकर यांना प्रवेश करण्यास अडथळा आणल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर जुने गोवा पोलिस त्यांची चौकशी करणार आहेत.

"फक्त हात वर करून आणि एकत्र येऊन निवडणूक जिंकू शकत नाही"

गोव्यात पुढचे सरकार आमचे असेल. फक्त हात वर करून आणि एकत्र येऊन तुम्ही निवडणूक जिंकू शकत नाही. जर आम्ही त्यांना चांगली पदे दिली तर विरोधी पक्षातील अनेक जण निवडून आल्यानंतर आमच्यात सामील होतील: मंत्री विश्वजित राणे

राष्ट्रगीतच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त गोव्यात सर्व भाजप कार्यालयांमध्ये एकाच वेळी हे प्रतिष्ठित राष्ट्रगीत गायले जाईल

राष्ट्रगीत वंदे मातरम् च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात होणाऱ्या समारंभाच्या अनुषंगाने ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता गोव्यात सर्व भाजप कार्यालयांमध्ये एकाच वेळी हे प्रतिष्ठित राष्ट्रगीत गायले जाईल. हा देशासाठी ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले. हा कार्यक्रम भारतीयांच्या पिढ्यांना एकत्र आणणाऱ्या आणि प्रेरणा देणाऱ्या गाण्याला श्रद्धांजली आहे.

गिरीमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली

गिरीमध्ये एका मोठ्या पाण्याच्या पाईपलाईनचे नुकसान झाले, ज्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले.

8.50 कोटी रुपयांची थकबाकी; मुरगाव पालिकेची इंडियन ऑईला कारणे दाखवा नोटीस

मुरगाव पालिकेने इंडियन ऑईल कॉरपोरेशनला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. साडे आठ कोटी रुपयांच्या लीज थकबाकी प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. १५ दिवसांत थकबाकी न भरल्यास कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

NSA In Goa: मोठी बातमी!  गोव्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

गोव्यात गुन्हेगारांवर कारवाईसाठी राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यात राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा पेच निर्माण करणाऱ्या विविध घटना घडल्या. यापार्श्वभूमीवर तीन महिन्यांसाठी गोव्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लागू करण्यात आला आहे.

Tripurari Pournima Goa: विठ्ठलापूर साखळीतील वाळवंटीत रंगाला नौकानयन सोहळा

विठ्ठलापूर साखळी येथील वाळवंटी नदीपात्रात त्रिपुरारी पौर्णिमा व नौकानयन सोहळा रंगला. त्रिपुरासुराच्या वधानंतर आकर्षक नौकांचा विहार. एकूण ३० नौका सहभागी. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष केदार नाईक, आमदार प्रेमेंद्र शेट, डॉ. चंद्रकांत शेट्ये यांची उपस्थिती.

बांबोळीत पुन्हा अपघात, दुभाजकाला धडकला फिश कंटेनर

कार आणि टँकरचा भीषण अपघात होऊन दोघांच्या मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, बांबोळीत पुन्हा एकदा अपघात झाला आहे. भरधाव फिश कंटेनर दुभाजकाला धडकून हा अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com