Goa News: राजेश कळंगुटकर गोवा फॉरवर्डमध्ये, वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa News Live Update's In Marathi: फोंडा पोटनिवडणूक, गुन्हे, राजकारण, कला - क्रीडा - संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी.
Goa News
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: राजेश कळंगुटकर गोवा फॉरवर्डमध्ये

'आप'चे माजी नेते राजेश कळंगुटकर गोवा फॉरवर्डमध्ये दाखल झाले आहेत. आमदार विजय सरदेसाई यांनी त्यांचं स्वागत केलंय.

Goa Road Issue: काणकोण बसस्थानकाजवळील रस्त्याची दुर्दशा, चालक हैराण

काणकोण बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळील मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे विशेषतः दुचाकीस्वारांना तोल सांभाळणे अवघड जात आहे. दिवसभर वाहतुकीचा मोठा ताण असलेल्या या भागात वाहनचालकांना सावधगिरीने वाहन चालवावी लागत आहे. नागरिकांनी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

सहावा वेतन आयोग लागू करा; 190 पंचायतीच्या 450 कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

सहावा वेतन आयोग लागू करा, या मागणीसाठी राज्यातील १९० पंचायतीच्या ४५० कर्मचाऱ्यांनी साखळी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. २०१६ पासून ही मागणी प्रलंबित असल्याचे कर्मचारी म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले आहे.

बेशिस्त पार्किंगचा फटका; म्हापशात कार पलटी

म्हापशात कार पलटी होऊन अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. बेशिस्त पार्किंगमुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. अपघातामुळे या भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली. यात चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

मागण्या पूर्ण झाल्या नाही तर... गोवा डेअरी कर्मचाऱ्यांचा उपोषणाचा इशारा

मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर उपोषणावर जाण्याचा इशारा गोवा डेअरीच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. याबाबतची नोटीस व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक यांना कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे. यासाठी १० नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे.

'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

पेडणे तालुक्यात भात कापणी मशीनसंदर्भात कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या गैरव्यवस्थापनाने त्रस्त झाल्याने 'कृषी विभूषण' शेतकरी तथा पेडणे तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष उदय प्रभुदेसाई यांनी कृषी खात्याच्या करंझाळे येथील कार्यालयाबाहेर छेडले आंदोलन. मागणी मान्य झाल्याशिवाय माघार न घेण्याचा इशारा.

'पाकिस्तान झिंदाबाद' फलक प्रकरणी बजरंग दल आक्रमक; तक्रार दाखल

बागा आणि हडफडे येथे झळकलेल्या पाकिस्तान झिंदाबाद डिजिटल फलकप्रकरणी बजरंग दल आक्रमक झाले आहे. बजरंग दलाच्या गोवा विभागाने याप्रकरणी उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण गंभीर आणि देशद्रोही असल्याचे मत नोंदवर कठोर कारवाई करण्याची मागणी दलाने केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com