Goa News: साळगाव हत्या प्रकरण, थिवी रेल्वे स्थानकावरुन पीडितेची स्कूटर जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa News Live Update In Marathi: आगामी चित्रपट महोत्सव (इफ्फी), फोंडा पोटनिवडणूक, राजकारण, गुन्हे, अपघात, पर्यटन, कला - क्रीडा - संस्कृती यासह विविध क्षेत्रातील ताज्या बातम्या.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

साळगाव हत्या प्रकरण, थिवी रेल्वे स्थानकावरून पीडितेची स्कूटर जप्त

साळगाव हत्याकांड प्रकरणात, पोलिसांना थिवी रेल्वे स्थानकाजवळ पीडित रिचर्ड डी'मेलोची स्कूटर सापडली. संशयित स्कूटरवरून पळून गेला होता. साळगाव पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि पुढील तपासासाठी स्कूटर जप्त केली.

Pernem: पेडण्यात खैरीच्या झाडांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक

पेडणे येथे खैरीच्या झाडांची बेकायदेशीर कत्तल करून लाकूड तस्करी करणाऱ्या दोघांना वन खात्याने अटक केली आहे. पेडणे वन विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात खैर लाकूड जप्त करण्यात आले आहे.

Zilla Panchayat Elections: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून आरक्षण जाहीर

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी १८ मतदारसंघ महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. उत्तर गोव्यात: अरंबोल, कोलवाले, कळंगुट, रीस-मागोस, चिंबेल, मायेम. दक्षिण गोव्यात: उसगाओ-गांजे, वेलिंग-प्रिओल, बोरिम, बार्सेम, शिरोडा.

Farmagudi: शिवरायांच्‍या डिजिटल संग्रहालयाच्‍या निविदा

फर्मागुढी येथे छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल संग्रहालय उभारण्‍यासंदर्भात पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) निविदा जारी केली आहे. त्‍यात सहभागी होण्‍यासाठी २५ नोव्‍हेंबरची मुदत देण्‍यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या स्‍मृती कायम ठेवण्‍याच्‍या अनुषंगाने राज्‍य सरकारने काही महिन्‍यांपूर्वी केंद्र सरकारच्‍या विशेष भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष साहाय्य (एसएएससीआय) योजनेचा लाभ घेऊन फर्मागुढी येथे डिजिटल संग्रहालय उभारण्‍याची घोषणा केली होती.

Bicholim: फ्लॅटमध्ये अडकलेल्या माय-लेकीची सुटका

बेडरूमच्या दरवाजाला ‘लॉक’ पडल्याने आईसह तिची १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी अडकून पडली. मात्र, डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवून आईसह मुलीची सुखरूप सुटका केली. ही घटना गोविंदनगर-सर्वण येथील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये घडली.

Margao: मडगावात सापडले दोन अनोळखी मृतदेह

मडगाव शहरातील स्टेशन रोड तसेच आके येथे प्रत्येकी एक असे दोन अनोळखी मृतदेह सापडले. मडगावच्या जुन्या हरी मंदिराजवळ काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सुमारे ३० ते ३५ वर्षे वयाच्या एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. १०८ आपत्कालीन सेवेच्या वाहनाने त्याला सरकारी इस्पितळात नेण्यात आले, तेव्हा त्याला मृतावस्थेत आणल्याचे डॉक्टरांनी नोंद केले.

साळगाव खून प्रकरण; संशयितांना लवकरच अटक केली जाईल, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

साळगाव खून प्रकरणातील संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले आहे. उमाकांत खोत प्रकरणात संशयितांना अटक केली असून, तपास सुरु असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

कचरा कामगार वेतन घोटाळा! सांताक्रूझ ग्रामपंचायतीचा सरकारी सेवक आणि पंच सदस्याविरुद्ध ACB कडून FIR दाखल

कचरा कामगार वेतन घोटाळ्याप्रकरणी सांताक्रूझ ग्रामपंचायतीचा सरकारी सेवक आणि पंच सदस्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने एफआयआर दाखल केला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, ७अ आणि ११ आणि बीएनएस कायद्याच्या कलम ३१४, ३१६(५), ३१८, ३१९ आणि ६१ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांताक्रूझच्या सर्व करदात्यांचा हा विजय आहे, असे तक्रारदार इनासियो डोमनिक परेरा म्हणाले.

डिचोलीत घुमले 'वंदे मातरम्' गीताचे स्वर

डिचोलीत घुमले 'वंदे मातरम्' गीताचे स्वर. आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज सरकारी शाळेत तालुकास्तरीय 'वंदे मातरम्' कार्यक्रम उत्साहात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com