

वाळपई येथे एका मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. राणे शॉपजवळ असलेल्या प्रवीण नाईक यांच्या वडापावच्या दुकानात दुपारी 4:12 वाजता एलपीजी गॅस सिलिंडरची गळती होऊन आग लागली. या घटनेनंतर शेजारील व्यावसायिक हसन राणे यांनी मोठे धाडस दाखवत तत्परता दाखवली. त्यांनी जराही वेळ न घालवता, आपल्या दुकानातील अग्निशमन यंत्राचा वापर करुन आग त्वरित नियंत्रणात आणली. हसन राणे यांच्या या समयसूचक आणि धाडसी कृतीमुळे आग आजूबाजूला पसरण्यापूर्वीच थांबली. अन्यथा, सिलिंडरचा स्फोट होऊन मोठी हानी होण्याची शक्यता होती.
कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हणजूण (Anjuna) येथील वाहतूक विभागाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत, हणजूण येथे आवाजात बदल केलेले सायलेन्सर लावलेल्या दोन (2) वाहनांना जप्त करण्यात आले आहे.
वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंजुना परिसरात अनेक दुचाकीचालक आणि वाहनधारक त्यांच्या गाड्यांमध्ये बेकायदेशीरपणे बदल करुन मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवतात. यामुळे ध्वनिप्रदूषण वाढते आणि स्थानिकांना तसेच पर्यटकांना मोठा त्रास होतो.
गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी रेव्होल्यूशनरी गोवन्स (RG) पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांना सल्ला दिला आहे. सरदेसाई यांनी म्हटले की, पोगो (POGO) बिलासाठी मनोज परब यांच्याबद्दल आदर असला तरी, 'मी परप्रांतीय मतांवर अवलंबून नाही,' हे त्यांचे विधान पूर्णपणे चुकीचे असुून परब यांनी ते तातडीने दुरुस्त (Correct) करावे.
पाकिस्तान जिंदाबादचा फलक लावणाऱ्याविरोधात कडक कारवाई करणार, असे अश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले आहे. बागा आणि हडफडे येथे सलून आणि दारुच्या दुकानावरील डिजिटल फलकावर पाकिस्तान जिंदाबादच्या मजकूर लिहण्यात आला होता.
मनोज परब यांच्यापेक्षा आमचं गोव्यावर अधिक प्रेम आहे. कर्नाटक आमची जन्मभूमी आहे पण गोवा कर्मभूमी. आम्हाला गोवा आणि कर्नाटक यांच्यातील बंध अधिक मजबूत करायचा आहे. घाटी - घाटी म्हणत आरजीला किमान एकतरी जागा जिंकता आली अन्यथा तेही शक्य नव्हते, असा पलटवार सिद्धण्णा मेटी यांनी लगावला आहे.
पावसाचा अंदाज व अधूनमधून बरसात सुरू असतनाच आज सकाळी साखळीत लोकांना दाट धुके अनुभवले. धुके बरेच दाट असल्याने वाहनचालकांना काळजीपूर्वक वाहने हाकावी लागत होती.
सिद्धन्ना मेटी यांनी पुन्हा मनोज परब यांच्यावर हल्लाबोल करत त्यांना जोरदार प्रतित्युत्तर दिले आहे. गरीब लोकांच्या बाबतीत अजिबात राजकारण झालं नाही पाहिजे. मतांसाठी परब स्थलांतरितांना टार्गेट करतंय असा आरोपही मेटींनी केला. इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा असं धोरण वापरलं त्याप्रमाणे आरजी स्थलांतरीतांचा द्वेष करुन गोमंतकीयांमध्ये फूट पाडतंय, असे मेटी म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.