Goa News Wrap: लोकसभा, गुन्हे, क्रीडा, राजकारण यासह गोव्यातील विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा आढावा

Goa Today's 06 April 2024 live news update breaking in Marathi: क्राईम, राजकारण, क्रीडा, संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडींचा आढावा.
Goa Live News Update
Goa Live News UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेसचे उमेदवारांचा फरक नाही पडत, दोन्ही जागा आम्हीच जिंकणार - मुख्यमंत्री सावंत

Goa Congress

काँग्रेसचे लोकसभा उमेदवार कोण आहेत, याचा फरक पडत नाही. राज्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार असा विश्वास मुख्यंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. उत्तरेत एक लाख आणि दक्षिणेत साठ हजारांचे मताधिक्य भाजप उमेदवाराला मिळेल असे सावंत म्हणाले.

CM pramod sawant
CM pramod sawantDainik Gomantak

लाचखोरीच्या आरोपानंतर काँन्स्टेबलचे निलंबन!

लाचखोरी प्रकरणात तेरेखोल कोस्टल पोलिस स्थानकाचे हवालदार संजय तळकर निलंबित. तळकर विरोधात दक्षता खात्यात करण्यात आली होती तक्रार.

भाजपचे कार्यकर्ते झालेत 'कंत्राटी कामगार'!

Goa Congress

एका दिवसात पक्षाच्या सदस्य झालेल्या व्यक्तीला भाजपने थेट लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे कार्यकर्ते आता फक्त 'कंत्राटी कामगार' बनले आहेत. कॉंग्रेस नेते गिरीश चोडणकरांची टीका.

Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

काँग्रेस काळात शांतता, कायदा सुव्यवस्था आणि सर्वधर्म समभाव! - एलिना साल्ढाणा

Goa Congress

भाजपच्या माजी मंत्री एलिना साल्ढाणांचा काँग्रेस प्रवेश. काँग्रेस सरकारच्या काळात राज्यात कायदाआणि सुव्यवस्था, सर्वधर्म समभाव अस्तित्वात होता. काँग्रेस प्रवेशानंतर एलिना साल्ढाणांचे प्रतिपादन.

Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

काँग्रेस पक्षाकडून दोन्ही उमेदवारांचे अभिनंदन!

उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्याचे उमेदवार खलप आणि कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचे प्रदेशाध्यक्ष पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गिरीश चोडणकर यांनी इतर नेत्यांच्या उपस्थितीत केले अभिनंदन. कार्यकर्ते व नेत्यांची काँग्रेस कार्यालयात गर्दी‌.

Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

काँग्रेसकडून विचारपूर्वक चांगल्या उमेदवारांची घोषणा - विजय सरदेसाई

काँग्रेसकडून विचारपूर्वक चांगल्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. नेतृत्वाशी चर्चा करुन प्रचाराची सुरुवात करण्याचे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.

खलप मोठे नेते असून, फर्नांडिस चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत. दोघांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रमाकांत खलप यांची पहिली प्रतिक्रिया

म्हादईचे संरक्षण, जमीन रुपांतरणाला रोखणे आणि गोव्याची ओळख जपणे यासाठी काँग्रेसचे सर्वोच्च प्राधान्य असेल. चला आपली भूमी आणि वारसा यासाठी एकत्र येऊया! काँग्रेसकडून उत्तर गोव्यातून लोकसभा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रमाकांत खलप यांची प्रतिक्रिया

तिकीट नाकारलेले काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन बंडखोरीच्या तयारीत?

काँग्रेसचे उमेदवारी मिळाली नसल्याने मी निराश नक्की पण दु:खी नाही. जो माणूस एकही निवडणूक कधी जिंकलेला नाही त्या माणसाला काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

मला उमेदवारी दिली असती तर मी नक्की जिंकलो असतो. पुढील राजकीय वाटचाल माझ्या समर्थकांसह चर्चा केल्यानंतर ठरवीन. तिकीट नाकारल्यानंतर काँग्रेसच्या फ्रान्सिस सार्दिन यांची प्रतिक्रिया.

सांतिनेजमधील ‘त्या’ वडाचे झाडाचे होणार स्थलांतर

वनखात्याने परवानगी दिल्यानंतर आणि वनप्रेमींनी विरोध करूनही मध्यरात्री सांतिनेजमधील वडाचे झाड हटवण्याचे काम सुरू झाले. पहाटेपर्यंत वडाच्या झाडाच्या जमिनीतील मुळ्यांचा भाग मोकळा करण्याचे काम सुरू होते.

सकाळपासून दुपारपर्यंत कंटेनरवर झाडाचे खोड कंटेनरवर बसविण्याचे प्रयत्न सुरू होते. क्रेन, दोन जेसीबीच्या साह्याने ही कसरत दुपारपर्यंत सुरू होती.

Goa Today's Live News
Goa Today's Live NewsDainik Gomantak

वाळपई ठाणे मार्गावर पाण्याची पाईप फोडल्याने हजारो लिटर पाणी वाया

वाळपई ठाणे मार्गावर भूमीगत वीज वहिनी घालताना पाण्याची पाईप फोडल्याने हजारो लिटर पाणी वाया. वारंवार पाइपलाइन फोडण्याच्या प्रकारात वाढ

अरविंद केजरीवाल यांच्या विरोधातील लाचखोरीची तक्रार म्हापसा कोर्टाने फेटाळली

दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात २०१७च्या विधानसभा निवडणूकीदरम्यान त्यांनी केलेल्या विधानासाठी निवडणूक-संबंधित लाचखोरीची तक्रार म्हापसा कोर्टाने फेटाळली.

मतदारांना कोणत्याही पक्षाकडून पैसे स्वीकारण्याचे आवाहन करीत, मत झाडू चिन्हाला द्या असे केजरीवाल त्यावेळी म्हणाले होते.

गुलालोत्सवात सापडलेले सोन्याचे ब्रेसलेट मूळ मालकाला केले परत

जांबावलीचा गुलालोत्सवात सापडलेले सोन्याचे ब्रेसलेट मूळ मालकाला केले परत. राहुल गाडेकर आणि विराज मडकईकर यांना 2 एप्रिल रोजी गुलालोत्सवात सापडलेले ब्रेसलेट पणजीतील सुजित लवांडे यांच्याकडे सुपूर्द केले.

खलप, कॅप्टन विरियेतो कॉंग्रेस उमेदवार!

Summary

Goa Congress Loksabha Candidate

उत्तर गोव्यातून अ‍ॅड. रमाकांत खलप तर दक्षिण गोव्यातून कॅप्टन विरीयातो फर्नांडीस कॉंग्रेस उमेदवार. अखेर उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा.

अखेर स्मार्ट सिटीने 'त्या' वृक्षाचा बळी घेतलाच

Smart City Panaji

स्मार्ट सिटीच्या कामानिमित्त सांतिनेज येथील 200 वर्ष जुन्या वडाच्या झाडाची मध्यरात्री पोलिस संरक्षणात कत्तल. शुक्रवारी दिवसभर पर्यावरण प्रेमींनी हे वृक्ष तोडण्यावरून सरकारी अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली होती.

Smart City Panaji
Smart City PanajiDainik Gomantak

CBI, ED अधिकारी असल्याचे भासवत IT कंपनीच्या अधिकाऱ्याला 1.21 कोटींचा गंडा, गुजरातच्या दोघांना अटक

Goa Crime News

कधी मुंबई पोलिस कधी CBI किंवा ED अधिकारी असल्याचे भासवत आयटी कंपनीच्यास अधिकाऱ्याला 1.21 कोटींचा गंडा घातला. याप्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने राजकोट- गुजरात येथील रवींद्र नंदनिया आणि विमल देर यांना अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com