कोकणी अकादमीच्या सचिव मेघना शेटगांवकर यांच्याकडे समाज कल्याण खात्याच्या OSD पदाचा दिव्यांग सशक्तीकरण खाते तसेच SERT च्या संचालक पदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आलाय.
दाबोळी विमानतळ बंद होणार नाही. दाबोळी आणि मोपा दोन्ही विमानतळ चालू राहणार. भविष्यात गोव्यात पर्यटकांची संख्या वाढणार. त्यामुळे गोव्यात तिसऱ्या विमानतळाची गरज भासणार. तिसऱ्या जिल्ह्यानंतर मंत्री रवी नाईकांचे तिसऱ्या विमानतळाबाबत मजेशीर प्रतिपादन.
राज्यातील दोन्ही विमानतळ दाबोळी व मोपा सुरूच राहणार, विमाने दोन्ही विमानतळावरून उडणार. लोकांच्या सोयीनुसार लोक इच्छित विमानतळावर जाऊ शकतात, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले.
माहिती तंत्रज्ञान खात्यात कंत्राटी पद्धतीवरील नोकरीसाठी 1 लाखाची लाच मागितल्याप्रकरणी निलंबित झालेल्या आयटी उपसंचालक सिद्धार्थ बोरकर याच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दक्षता खात्याच्या लाचलुचपतविरोधी विभागामार्फत (ACB) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकशीसाठी त्याला लवकरच समन्स पाठवण्यात येणार असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी प्रशांत बस्तावडकर (22, रा. खानापूर बेळगाव, कर्नाटक) याला कोलवा पोलिसांकडून अटक.
संशयित आरोपीने पीडितेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याचीही दिली होती धमकी. पालकांच्या तक्रारीनंतर कारवाई.
राज्यात नव्याने 261 होमगार्ड्सची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्यांनी नियुक्तीपत्र देण्यात आले.
पंचायत चलो अभियान मंत्री विश्वजीत राणे यांनी मुरागावला भेट दिली. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात राणे यांनी 20 खाटांचे प्राथमिक आरोग्य केंद्र, मुरगावसाठी कार्डियाक युनिट रुग्णवाहिका, मार्केट कॉम्प्लेक्स, बोगदा आणि जेट्टी येथे रिटेनिंग वॉल आणि महापालिका कामगारांना नियमित करण्याचे आश्वासन दिले.
माडेल फातोर्डा येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
कोणालाही तिकीट मिळो आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सूचनांप्रमाणे काम करु. दयानंद सोपटे यांना तिकीट मिळाल्यास पाठिंबा देणार का? या प्रश्नावर मांद्रेचे आमदार जीत आरोलकर बोलत होते.
माझ्या मतदारसंघात मी भाजपसाठी काम करणार. आमदार म्हणून आधी मुख्यमंत्री नंतर पक्ष, आरोलकरांचे विधान.
विक्री कर विभागाच्या वतीने GRATIPOS अधिनियमाअंतर्गत 16,412 लाभार्थ्यांना 48.5 कोटी रुपयांची कर माफी. 10,000 पेक्षा कमी थकबाकी असणाऱ्यांचा कर माफ करण्याचा निर्णय. व्यापाऱ्यांना कर माफी देण्यासाठी वन टाईम सेटलमेंट योजना राबवली आहे.
थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र विभागाच्या वेबसाइटवरुन घेता येईल, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती.
म्हार्दोळ जाईंचे मळे रक्षणासाठी गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांचे मुख्यमंत्री, कृषी आणि नगरनियोजन मंत्र्यांना पत्र. जाईसाठी GI टॅगची मागणी.
सर्व्हे नंबर सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करून जमीन पारंपरिक जाईच्या शेतकऱ्यांकडे रहावी यासाठी 'लँड टू टिलर' धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी.
एल्विस गोम्स यांनी उमेदवारीसाठी अर्ज केला नव्हता हे कॉंग्रेसच्या एम.के शेखांच विधान धादांत खोटे. सर्वात आधी अर्ज करणारे व्यक्ती एल्विस होते.
मी स्वतःहा एल्विस यांचा अर्ज एम.के.शेखांकडे दिला होता तो त्यांनी का स्वीकारला नाही याचे उत्तर द्यावे. फातोर्डा कॉंग्रेस पदाधिकारी मॅल्वीन फर्नांडीसांचे शेखांना प्रत्यूत्तर.
लोकसभा उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांची भुमिका ठरणार निर्णायक. कवळेकर की सावईकर या दोघांच्यात उमेदवारीसाठी मोठी चढाओढ. ज्याच्या बाजूने मुख्यमंत्री त्याला उमेदवारी.
लोकसभा उमेदवारी निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला रवाना. आज संध्याकाळी जे.पी.नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक. प्रदेशाध्यक्ष तानावडेही असणार उपस्थित.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.