
फोंडा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची सही करून बनावट उत्पन्न दाखला दिल्या प्रकरणी नगरसेवक शिवानंद सावंत तसेच सदानंद प्रभुगांवकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी फर्मावल्यानंतर त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेताना दोघांनाही वैयक्तिक दहा हजार रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर.
केंद्र सरकारने आज राज्य सरकारांना 1,73,030 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी केले आहे. यातून गोव्याला 667.91 कोटी परतावा मिळाला आहे.
भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, तसेच विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चाला वित्तपुरवठा करण्यास राज्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने या महिन्यात अधिक रक्कम हस्तांतरित केली जात आहे. डिसेंबर 2024 मध्ये राज्य सरकारांना जारी करण्यात आलेले कर हस्तांतरण 89,086 कोटी रुपये इतके होते.
कुचेलीत सरकारी जागेवर उभारण्यात आलेली बेकायदेशीर घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. हायकोर्टाने कोमुनिदाद जागेतील बेकायदेशीर घरे हटवण्याचे आदेश दिले होते. यापूर्वी यातील काही घरे पाडण्यात आली होती. दरम्यान, उरलेली चार घरे आता जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
गोवा लाइव्हलीहुड्स फोरम (GLF) द्वारे ग्राउंडब्रेकिंग अहवालाचे अनावरण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. ग्रामीण सशक्तीकरणात गोव्याची अपवादात्मक प्रगती दिसून आलीय. महिलांच्या नेतृत्वाखालील स्वयंसहायता गट आघाडीवर आहेत.
राज्याने पर्यायी उत्पन्न, ग्रामीण कुटुंबांमध्ये स्वयंपूर्णता आणि SVEP आणि PMFME द्वारे शाश्वत वाढ, दिसून आलीय. गोव्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतील हा आदर्श बदल मोदीच्यां स्वावलंबी ग्रामीण भारताचा दृष्टीकोन दर्शवतो. आपण मिळून शहरी-ग्रामीण हा भेद दूर करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ग्रामीण विकासाचे स्वप्न साकार करण्यात गोवा अग्रेसर आहे, असे सावंत म्हणाले.
कुंकळ्ळीत नव्याने येणाऱ्या दोन प्रकल्पांसाठी गोवा औद्योगिक विकास महामंडळाकडून जागेची पाहणी करण्यात आली. कुंकळ्ळीत १६ खाटांचे शहरी आरोग्य केंद्र आणि खेळासाठी खुले दालन उभारले जाणार आहे. यामुळे कुंकळ्ळीत अधिक आरोग्य आणि क्रीडा सुविधा मिळण्यास मदत होणाराय.
करसंगे बोरी येथे घराला आग लागल्याची घटना समोर आली आहे. फोंडा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, अगीवर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न सुरु आहे.
दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांचे वडील प्रुडेंते फर्नांडिस यांचे निधन झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.