Goa's Update: अपघात, लैंगिक अत्याचार, लोकसभा निवडणूक यासह गोव्यात दिवसभर घडलेल्या घडामोडींचा आढावा

Goa Today's 13 April 2024 Breakings In Marathi: राज्यातील राजकारण, गुन्हे, पर्यटन, क्रीड, संस्कृती आणि विविध क्षेत्रातील बातम्यांचा आढावा.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.Dainik Gomantak

गोव्यात पावसाची शक्यता

दक्षिण गोव्यात आज हवामान खात्याच्या वतीने पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सुलक्षणा सावंत स्टार प्रचारक, मात्र तीन महिला आमदारांचा समावेश नाही!

राज्य भाजपने जाहीर केलेल्या गोव्यातील स्टार प्रचारकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती सुलक्षणा सावंत यांच्या नावाचा समावेश. मात्र भाजपच्या तीन महिला आमदार डिलायला लोबो, जेनिफर मोन्सेरात आणि डॉ. देविया राणे यांचा मात्र स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश नाही.

मयेतील 'माल्या'ची जत्रा निलंबीत

मयेतील 'माल्या'ची जत्रा निलंबीत. श्री माया केळबाई देवस्थान समितीचा निर्णय. मामलेदार कार्यालयाला निवेदन. मयेत यंदाही 'माले' पेटणार नाही. अन् देवीचा 'पण'ही अपूर्ण राहण्याचे संकेत.

धेंपे, भाऊंचा, मोदी - शहा करणार प्रचार

आगामी लोकसभेसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध. गोव्यातील उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे. पी नड्डा करणार प्रचार. कुडचडे येथे मोदींची सभा नियोजित असून, लवकरच तारीख जाहीर केली जाणार.

Modi - Shah
Modi - ShahDainik Gomantak

थिवीत दुचाकी - ट्रक अपघातात महिला ठार

थिवीत दुचाकी आणि ट्रकचा अपघात. अपघातात सुजाता साळगावकर (26, रा. नास्नोडा) या महिलेचा जागीच मृत्यू. कोलवाळ पोलिसांनी केला पंचनामा.

शिवोलीत मारहाण प्रकरणी एकाला अटक

शिवोलीत दशरथ दिवेकर यांना मारहाण. हणजुण पोलिस स्थानकात गुन्हा नोंद. पोलिसांकडून संशयित चिंतामणी शिमीपुरुस्कर याला अटक करण्यात आली आहे.

सांगोल्डातील बेघरांच्या निवाऱ्यासाठी नाईक मुख्यमंत्र्याची भेट घेणार

सांगोल्डा येथील कोमुनिदाद मामलत्तेमधील सर्व बेकायदेशीर 22 घरे पाडली असून या बेघर झालेल्या लोकांच्या शिष्टमंडळासोबत स्थानिक आमदार केदार नाईक घेणार मुख्यमंत्र्याची भेट. आज शनिवारी सायंकाळी होणाऱ्या बैठकीत लोकांच्या निवाऱ्यासंदर्भातील पर्यायावर होणार चर्चा.

गोव्यातून कर्नाटकात मद्य वाहतूक, चौघे ताब्यात

गोव्याहुन ३३ लिटर दारु घेऊन आडमार्गे तिनईघाट कर्नाटक येथे जाताना कुळे पोलिसांनी मोले येथे गस्तीवर असताना प्रकाश देवप्पा हनबार वय १९,नागेश अशोक वडार वय १९,अशोक देवप्पा हनबार वय १९ व बोंडाप्पा नारायण हनबार वय २७ सर्वजण तिनईघाट कर्नाटक येथील असुन त्यांच्या दोन्ही दुचाक्या जप्त केल्या आहेत. गाडीसहीत एकुण दारुची किंमत १.२८ हजार आहे.

कुळे पोलिस निरीक्षक सगुण सावंत याच्या मार्गदर्शन खाली साहाय्यक उपनिरिक्षक सुमन गांवकर यांनी कारवाई करून चौघाना ताब्यात घेतले.

Goa Liquor Seized
Goa Liquor SeizedDainik Gomantak

सांगोल्डातील सर्व बेकायदेशीर घरे जमीनदोस्त

Sangolda Illegal Houses Demolished

सांगोल्डा येथील कोमुनिदाद मामलत्तेमधील सर्व बेकायदेशीर २२ घरे पाडली. आज दुसऱ्या दिवशी उर्वरित ७ बांधकामांवर फिरवला हातोडा.

Sangolda Illegal Houses Demolished
Sangolda Illegal Houses DemolishedDainik Gomantak

करदात्यांचे पैसे गटारात टाकणे हाच भाजपचा "विकसीत भारत" - ॲड. रमाकांत खलप

करदात्यांचे पैसे गटारात टाकणे हाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘विकसीत भारत’ आहे का, याचे उत्तर माझे प्रतिस्पर्धी उमेदवार श्रीपाद नाईक गोमंतकीयांना देतील का? अशा प्रकारे सार्वजनिक निधी गटारांत टाकणे योग्य आहे का?

पणजी स्मार्ट सिटीत गोंधळ झाल्यानंतर आता सांगोल्डा येथे बेजबाबदारपणाने काम केले जात आहे. 2004 ची इंडिया शायनिंग विसरू नका असा इशारा काँग्रेसचे उत्तर गोव्यातील उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी भाजपला दिला आहे.

पणजीत कारचा अपघात, चालक जखमी

पणजीत शुक्रवारी रात्री उशीरा गोवा मनोरंजन सोसायटी (Entertainment Society of Goa) समोर कारचालकाचा ताबा सुटून कार विजेच्या खांबाला धडकली. या अपघातात कारचालक किरकोळ जखमी झाला असून, सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.

Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com