Goa Today's Top News: घटकराज्य दिन, ड्रग्ज कारवाई, स्मार्ट सिटी; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Today's 30 May 2024 Breakings In Marathi: गोव्यात दिवसभर घडणाऱ्या ठळक बातम्यांच्या ताज्या अपडेट्स.
Goa arrest
Goa arrestDainik gomantak

गोवा घटकराज्य दिनानिमित्त अमित शहांकडून शुभेच्छा

गृहमंत्री अमित शहांनी सर्व गोमंतकीयांना गोवा घटकराज्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

आसगाव येथील एएनसीच्या कारवाईत दोघांना अटक, 7 लाखांचा ड्रग्ज जप्त

अमली पदार्थ विरोधी कक्षाने (ANC) आसगाव येथे टाकलेल्या दोन वेगवेगळ्या छाप्यामध्ये दिनेश ऊर्फ मेल्विन दांडेकर व निहाल पाटील या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 7 लाखांचा ड्रग्ज जप्त केला आहे.

संशयित दिनेश दांडेकर याच्याकडून पिस्तुलची 7 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ड्रग्जप्रकरणी एएनसीने तर शस्त्र बाळगल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

म्हापसा येथे दोघांना मारहाण, एकाची प्रकृती गंभीर

गणेशपुरी म्हापसा येथे वैयक्तिक रागातून चौघांकडून दोघा युवकांना जबर मारहाण. एकाची प्रकृती गंभीर. म्हापसा पोलिस संशयितांच्या मागावर. हेमद देवडी (३०) व संदेश साळकर (२८) अशी जखमींची नावे.

स्मार्ट सिटीचे ९० टक्के काम पूर्ण!

स्मार्ट सिटीचे ९० टक्के काम पूर्ण. उरलेले पावसात करता येईल. १८ जून रोडचे काम हातात घेण्यात आलेले नसल्याने यंदाही पाणी तुंबण्याची शक्यता. स्मार्ट सिटी कामांच्या पाहणी नंतर बाबुश मोन्सेरातांचे प्रतिपादन.

कामगार कायद्यात होणार दुरुस्ती!

कामगार कायद्यात सरकार दुरुस्ती करणार आहे. नोकरभरतीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या खाजगी कंपन्यांना फक्त ५०० रुपये दंड आहे तो मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार आहे‌. कामगार मंत्री बाबुश मोन्सेरातांची माहिती.

Minister Babush
Minister BabushDainik Gomantak

कसे झाले गोवा भारताचे राज्य

गोवा भारताचे २५ वे राज्य कसे झाले? वाचा सविस्तर...

गोव्यात नेले जाणारे ६०० किलो मांस खानापुरात जप्त

सुमारे ६०० किलो म्हशीचे मांस बेकायदेशीरपणे गोव्यात नेले जात असताना खानापूर, कर्नाटक येथे जप्त करण्यात आले.

सदर मांस ७८ हजार रुपये किंमतीचे असून खानापूर पोलिसांनी वाहन अडवल्यानंतर कर्नाटक नोंदणीकृत वाहनाचा चालक व क्लिनर घटनास्थळावरून पळून गेले.

पर्यावरण मंत्रालयाचा ‘वेदांता’ला धक्का

वेदांताच्या (सेसा) न्हावेली आणि आमोणे येथील पिग आयर्न प्रकल्पाच्या नियोजित विस्तारीकरणास ‘ईसी’ मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे. ‘ईसी’साठी कंपनीने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला होता.

मात्र प्रस्तावातील त्रुटीवर बोट ठेवून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने नियुक्त केलेल्या तज्ञ मूल्यांकन समितीने हा ‘ईसी’ देण्यास तूर्त असहमती दर्शवली आहे.

राहुल गांधींकडून गोमंतकीयांना घटकराज्य दिनाच्या शुभेच्छा

Rahul Gandhi Greets Goan's on Statehood day

गोव्याच्या जनतेला घटकराज्य दिनाच्या शुभेच्छा. गोव्याचे वैविध्यपूर्ण वातावरण, आकर्षक निसर्ग, समृद्ध इतिहास आणि दोलायमान संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याची प्रतिज्ञा करूया. राज्याने प्रगतीचे नवे आयाम गाठावी यासाठी आपण एकत्रितपणे काम केले पाहिजे, अशा शुभेच्छा राहुल गांधींनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दिल्या गोमंतकीयांना घटकराज्य दिनाच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व गोमंतकीयांना दिल्या घटकराज्य दिनाच्या शुभेच्छा

कर्नाटकहुन वेर्णा येथे जाणाऱ्या अवजड ट्र्कचा सुकतळी मोले येथे अपघात

Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak

कर्नाटकहुन वेर्णा येथे जाणाऱ्या अवजड ट्र्कला सुकतळी मोले येथे रात्री 2:20 वाजता अपघात. रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाला अवजड ट्र्कची धडक.चालक गंभीर जखमी. चालक बांबोळी येथे उपचारासाठी दाखल. कुळे पोलिस तपास करतायेत.

Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com