Goa's TOP News: पाऊस, अपघात, गुन्हे यासह गोव्यातील ठळक बातम्यांचा आढावा

Goa Today's 16 May 2024 Breaking News: राज्यातील राजकारण, गुन्हे, पर्यटन, क्रीडा यासह विविध क्षेत्रातील बातम्यांचा आढावा.
Accident
AccidentDainik Gomantak

कोईम्बतूर येथील शिबिरासाठी मोहित रेडकरची निवड

10 ते 29 जून 2024 या कालावधीत कोईम्बतूर, TNCA येथे उदयोन्मुख U-23 पुरुष खेळाडुंसाठी होणाऱ्या एनसीए उच्च-कार्यक्षमता शिबिरासाठी गोवा क्रिकेट असोसिएशनकडून मोहित रेडकर याची निवड.

जमीन हडप प्रकरण; ईडीकडून विशेष न्यायालयात तक्रार

Goa Land Grabbing Case

गोव्यातील जमीन हडपप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून 12 मे रोजी म्हापसा विशेष न्यायालयाकडे तक्रार दाखल. विशेष न्यायालयाने घेतली तक्रारीची दखल.

वाळपई ठाणे मार्गावर मुख्य पाण्याची पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

वाळपई ठाणे मार्गावर मुख्य पाण्याची पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया. बांधकाम खात्याचे दुर्लक्ष. अनेक भागात नळ कोरडे.

शाब्बास! वानरमारे समाजातील गणेश ठरला SSC उत्तीर्ण होणारा पहिला विद्यार्थी

विरनोडा येथील वानरमारे, कातकरी समाजातील गणेश पवार ठरला दहावी उत्तीर्ण होणारा पहिला विद्यार्थी. 44% गुण प्राप्त. गणेश वाळपे येथील हायस्कुलमध्ये शिकत होता.

Goa SSC Result
Goa SSC ResultDainik Gomantak

गोव्यात यलो अलर्ट

गोव्यात विविध भागात गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

थिवी येथे पाच लाखांची घरफोडी

थिवी येथे घर बंद करून काल रात्री आपल्या नातेवाईकांकडे गेलेल्या कुटुंबियांच्या घरी चोरी. अज्ञात चोरट्यांनी 4 ते 5 लाखांच्या सुवर्णलंकारावर मारला डल्ला. कोलवाळ पोलिसांकडून तपास सुरू.

देवसा येथे घरफोडी; 1.65 लाखांचा मुद्देमाल लंपास

Theft Case

देवसा, सासष्टी येथील सुषमा उदय मांद्रेकर यांच्या घरी घरफोडी. 1.30 लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 35 हजार असा एकूण 1.65 लाखांचा मुद्देमाल लंपास.

सांताक्रुज ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप सावंत

Santa Cruz VP

सांताक्रुज ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत संदीप अंतोनिया सावंत हे ७ विरुद्ध ४ मताने निवडून आले. माजी उपसरपंच डॉमनिक परेरा यांना ४ मते तर माजी उपसरपंच एल्सन ब्रागांझा यांना शून्य मत मिळाले. त्यांनी संदीप याला पाठिंबा दिला.

मिरामार येथे अंगावर वीज पडून केरळच्या एकाचा मृत्यू

Death Due to Electrocution at Miramar

मिरामार समुद्रकिनाऱ्यावर वीज अंगावर पडून अखिल विजयन (35, केरळ) यांचा मृत्यू. सुदैवाने त्यांची पत्नी आणि मुले बचावली. बीचवरुन माघारी येताना घडली घटना, पणजी पोलिसांची माहिती.

पर्वरीत चारचाकीच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू

Porvorim Fatal Accident

पर्वरीत दुचाकीला चारचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकी चालक ब्रायडन विठ्ठल साळगावकर (४४) यांचा मृत्यू. ब्रायडन दुचाकीवरुन जात असताना चारचाकीने मागुन धडक दिल्याचा स्थानिकांचा आरोप.

Porvorim Fatal Accident
Porvorim Fatal AccidentDainik Gomantak

मंत्री सुभाष फळदेसाई यांना धमकी देणाऱ्याला रिवण येथून अटक

Goa Crime News

समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांना व त्यांच्या कुटुंबियांना धमकी देणाऱ्या मिथील देसाई (३२, रिवण) याला अटक करण्यात आली आहे.

Minister Subhash Phaldesai
Minister Subhash PhaldesaiDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com